Samantha Ruth Prabhu In Politics Saam tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu In Politics: समांथा रुथ प्रभू लवकरच सोडणार फिल्म इंडस्ट्री, अभिनेत्रीनंतर आता दिसणार राजकारणीच्या रुपात?

Samantha Prabhu News: सोशल मीडियावर समंथा आता राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Chetan Bodke

Samantha Ruth Prabhu In Politics

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने आपल्या सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी समांथा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या समांथा ‘कुशी’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आहे. चित्रपटामध्ये तिच्यासोबत, विजय देवरकोंडा देखील प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाला समीक्षकांसह प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. सध्या सोशल मीडियावर समंथा आता राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर समांथाच्या जंगलसफारीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. त्या फोटोंमुळे विजय आणि समांथाच्या पुन्हा एकदा रिलेशनची चर्चा होत आहे. पण जरीही असं असलं तरी, सध्या तिच्या राजकीय एन्ट्रीची तुफान चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर समांथाच्या राजकीय कारकिर्दीबाबतच्या अनेक चर्चा सुरू आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा सध्या राजकारणामध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, तिच्या राजकारणाच्या एन्ट्रीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर समांथा रुथ प्रभु राजकारणात येणार का अशी चर्चा होत आहे.

समांथा अनेकदा शेतकऱ्यांसंबंधित प्रश्नांना पाठिंबा दर्शवत असते. याआधी अनेकदा समांथा तेलंगणातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवताना दिसली होती, समांथा तेलंगणातील एका हातमाग कपड्यांच्या ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. समंथाने गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ती आजरपणामुळे एक वर्षाचा ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं. समंथा गेल्या काही दिवसांपासून मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार रोगाशी झुंज देत आहे. या आजाराविषयीची माहिती अभिनेत्रीने २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. सध्या समांथा तब्येतीमुळे अभिनय क्षेत्रापासून दुर आहे.

समांथा सध्या ‘कुशी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानंतर ‘सिटाडेल इंडिया’चित्रपटामध्ये देखील ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत चित्रपटामध्ये वरूण धवन देखील झळकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT