Samantha Ruth Prabhu Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu Fees: समंथा प्रभूच्या मानधनात घसघशीत वाढ, रक्कम वाचून व्हाल थक्क

समंथा प्रभूने आपली वाढती मागणी लक्षात घेऊन फी वाढवली आहे. पूर्वी जिथे ती एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये मानधन घेत होती, आता ती एका चित्रपटासाठी भरमसाठ रक्कम घेणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samantha Ruth Prabhu: समंथा प्रभूच्या मानधनात पुन्हा वाढ झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील सुंदर अभिनेत्री समंथा प्रभू सध्या 'शाकुंतलम' आणि 'यशोदा' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. सोबतच तिचे काही लूक आणि पोस्टर्स शेअर केले जात आहेत. सर्वच चाहते तिच्या या चित्रपटांच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यासोबतच समंथाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबद्दलही बरीच चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत आता समंथाने पुन्हा एकदा फी वाढवल्याचे कळते आहे. 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम साँगच्या लोकप्रियतेनंतर ती एक पॅन इंडिया स्टार बनली आहे. 'द फॅमिली मॅन' वेबसीरिज आणि 'जानू' चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समंथा प्रभूने आपली वाढती मागणी लक्षात घेऊन फी वाढवली आहे. पूर्वी जिथे ती एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये मानधन घेत होती, आता ती एका चित्रपटासाठी भरमसाठ रक्कम घेणार आहे.

अभिनेत्री आता एका चित्रपटासाठी 3-8 कोटी रुपये मानधन घेणार आहे. समंथा एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यामुळे तिला हवं असलेलं मानधन मिळेल याची चाहत्यांना खात्री आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक उत्तम डान्सर देखील आहे. तिचे एक्सप्रेशन आणि डान्स मूव्ह्स पाहून चाहते नेहमीच भारावून जातात.

याशिवाय समंथा तिच्या आगामी 'यशोदा' चित्रपटामुळेही चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर याचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्रीला तिच्या मित्रांनी घेरले आहे, जे तिची छेड काढताना दिसत आहेत.

अभिनेत्रीने तिच्या चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, 'तुम्हाला शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदाच्या शुभेच्छा.'असं म्हणत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टरसोबतच आता चाहते तिच्या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलही खूप उत्सुक आहेत, त्या चित्रपटाचा ट्रेलर 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

काही वेळापूर्वी 'यशोदा'चा टीझर प्रदर्शित झाला असून टीझर खूपच चर्चेत आला आहे. यामध्ये ती एका गर्भवती महिलेच्या लूकमध्ये दिसत होते. यामध्ये समंथा एजंटची भूमिका साकारत आहे. टीझरमध्ये सस्पेन्ससह थ्रिलर पाहायला मिळत आहे. 'यशोदा'सोबत ही अभिनेत्री गुणशेखरच्या 'शंकुतलम' चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT