Salman Khans House Firing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khans House Firing Case: सलमान खानला ठार करण्याच्या इराद्यानंच गोळीबार; तपासात धक्कादायक माहिती झाली उघड

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर घडली होती. यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क होत गोळीबार करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय.

Bharat Jadhav

Salman Khans House Firing Case Update: सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार ही वॉर्निग नव्हेतर त्याची हत्या करण्याच्या हेतूनेच गोळीबार केला गेला, अशी माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेने दिलीय.

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन शॉर्प शुटर्सला अटक करण्यात आलीय. विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१),अशी यांची नावे आहेत. हे दोघेही बिहारचे रहिवासी असून त्यांनी रविवारी पहाटे वांद्रे परिसरात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. पहाटे गोळीबाराची घटना घडल्यानंतर हे आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माता नो मध गावातून या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी गुप्ता मोटारसायकल चालवत होता आणि पाल हा त्यांच्या पाठीमागे बसला होता. त्यानेच सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या होत्या. आज या दोघांना मुंबई येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. गोळीबार कटाचा उलगडा करण्यासाठी आणि या घटनेमागील सूत्रधार ओळखण्यासाठी कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचं सांगत पोलिसांनी या आरोपींना १४ दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली.

त्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एल एस पडेन यांनी दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दोघांनी खान यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार केला होता. गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे. सूत्रधाराची ओळख पटवण्यासाठी आणि हेतू तपासण्यासाठी कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचं पोलिसांनी नोटमध्ये म्हटलंय. या गोळीबारात या दोघांचा सक्रिय सहभाग होता, प्राथमिक चौकशीत या आरोपींनी गोळीबार केल्याचा गुन्हा कबूल केलाय, असं पोलिसांनी सांगितले.

या आरोपींचा सलमान खान व्यतिरिक्त इतर कोणावर हल्ला करण्याची प्लान होता का? याचा तपास करण्यासाठी आरोपीला ताब्यात घेणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी त्यांच्या रिमांड नोटमध्ये म्हटले आहे. नोटनुसार अद्याप या घटनेत वापरलेले बंदुक जप्त केलेले नाही. आरोपींनी वापरलेल्या मोटारसायकलबाबतही चौकशी करणे आवश्यक असल्याचं पोलीस म्हणालेत.

दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडल्याच्या काहीवेळानंतर एका व्यक्तीने फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या हल्लाच्याची जबाबदारी स्वीकारली. तपासानुसार हे फेसबूक खाते परदेशातून चालवले जात होतं, अशी पुष्टी पोलिसांनी केलीय. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एफबी पोस्टचा आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) पत्ता पोर्तुगालचा आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), १२० -बी (गुन्हेगारी कट) आणि ३४ (सामान्य हेतूने अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT