Sikandar Teaser Google
मनोरंजन बातम्या

Sikandar Teaser : सलमान खानच्या 'सिकंदर'चा धमाकेदार टीझर रिलीज, दबंगच्या swagने जिंकली प्रेक्षकांचे मन

Sikandar Teaser : सलमान खानचे चाहते त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाच्या टीझरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून भाईजानच्या सिकंदरचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sikandar Teaser : बॉलीवूडचा दबंग सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'सिकंदर'चा टीझर आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी रिलीज झाला आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिकंदर'चा टिझर संध्याकाळी 4.05 वाजता रिलीज झाला असून या टिझर]ला प्रेक्षकांचा भरभरून प्रेतिसाद मिळत आहे.

सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाचा टीझर यापूर्वी 27 डिसेंबरला त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित होणार होता. मात्र माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे निर्मात्यांनी या टिझरची तारीख पुढे ढकली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्विटरवर नवीन रिलीजची तारीख आणि वेळेची माहिती देखील दिली होती. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ हा टीझर पोस्ट केला.

सलमानच्या चित्रपटाचा हा टीझर मन जिंकेल

सलमान खानच्या 'सिकंदर' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीझरने इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या टीझरमध्ये, सलमान खान पूर्णपणे नवीन अवतारात दिसत आहे, सलमान या टिझरमध्ये स्वॅगने परिपूर्ण दिसत आहे. जबरदस्त व्हिज्युअल आणि सिकंदरने सिनेमाची भव्यता या टिझरमधून पाहायला मिळत आहे.

टीझर रिलीजची वेळ दोनदा बदलण्यात आली

निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर एकदा नव्हे तर दोनदा बदलला आहे. सिकंदरचा टीझर लाँच होण्यास उशीर झाल्याची माहिती देताना निर्मात्यांनी टीझरच्या संदर्भात सोशल मीडियावर लिहिले होते, देश डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतो, आम्ही सिकंदरचा टीझर लॉन्च उद्या संध्याकाळी 4.05 वाजता ठेवला आहे. आम्ही राष्ट्राशी एकरूप आहोत. आम्ही तुमच्या समजूतदारपणाची आणि संयमाची प्रशंसा करतो. तुमच्या टीझरची प्रतीक्षा सार्थ ठरेल. यापूर्वी, चित्रपट निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली होती आणि सकाळी 11.07 वाजता टीझर रिलीज करण्याची माहिती दिली होती.

सलमान खान त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. निर्मात्यांनी अलीकडेच त्याचे फर्स्ट-लूक पोस्टर रिलीज केले होते, ज्याने सलमानच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणित केला होता.या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून एआर मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT