Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : करण वीरसोबतच्या मैत्रीवरून हिना खानने शिल्पाचं पितळ पाडलं उघडं, म्हणाली...

Hina Khan : बिग बॉसच्या घरात हिना खानने शिल्पा शिरोडकर आणि करण वीर मेहराची शाळा घेतली असून त्यांच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह केले आहे. नेमकं हिना खान काय बोलली जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉसच्या (Bigg Boss 18) घरात राडा दिवसेंदिवस वाढत जात आहे. सध्या 'वीकेंड का वार' बिग बॉसच्या घरात रंगला आहे. सलमान खान घरातील सदस्यांची शाळा घेताना पाहायला मिळत आहे. अशात आता सदस्यांना खडेबोल सुनावण्यासाठी टिव्ही अभिनेत्री हिना खान देखील बिग बॉस 'वीकेंड का वार'ला आली आहे.

बिग बॉसच्या मंचावर हिना खानची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. बिग बॉक्सच्या घरात नुकताच एक टास्क पार पडला त्यात घरातील सदस्यांना आपल्या एका मित्राचे नाव द्यायचे होते. ज्याचा त्यांना हेवा किंवा मत्सर वाटतो.

बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिना खान शिल्पा शिरोडकरची शाळा घेते. करण वीरला नॉमिनेट करण्याच्या निर्णयावर ती शिल्पाला प्रश्न करते. तर करणला देखील ती बोलते, तू स्वतःचा खेळ का नाही खेळत. तुला तुझ्या मैत्रीणीने नॉमिनेट केल्यावर स्वतःचे मत का नाही मांडलं. हिना खान करणवीरला त्याच्या गेममधील भूमिकेबद्दल प्रश्न करते.

हिना खान (Hina Khan ) स्वतःदेखील बिग बॉसची स्पर्धक राहिली आहे. बिग बॉसमधील तिचा गेम चाहत्यांना खूप आवडला. बिग बॉसच्या घरात हिनाला शेर खान अशी ओळखही मिळाली होती. सध्या हिना खान ब्रेस्ट कॅन्सशी झुंज देत आहे. मात्र तिने या संपूर्ण प्रवासात स्वतःला खूप सकारात्मक ठेवले आहे. या प्रवासातही ती काम करत आहे. कार्यक्रमांना जात आहे. बिग बॉसच्या मंचावर येताना ती 'लग जा गले' हे गाणे गाते. सलमान खान (salman khan ) देखील हिनाचे खूप कौतुक करतो आणि तिला 'रिअल लाइफ फायटर' म्हणतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT