Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 Finale: शेवटच्या क्षणी बाजी पलटली, विवियन डिसेनाची ट्रॉफी हुकली

Vivian Dsena : अखेर बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. 'बिग बॉस 18'चा विजेता करणवीर मेहरा झाला आहे. तर विवियन डिसेनाने बिग बॉसचे उपविजेते पद पटकावले आहे.

Shreya Maskar

सलमान खानच्या 'बिग बॉस 18'चा (19 जानेवारी) ग्रँड फिनाले पार पडणार आहे. करणवीर मेहराने 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी उचलली आहे. तर विवियन डिसेना उपविजेता झाला आहे. 'बिग बॉस 18' ((Bigg Boss 18)) हा सीझन 6 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोने तब्बल तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

'बिग बॉस 18'मध्ये सुरुवातीला 18 सदस्यांनी घरात प्रवेश केला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून पाच सदस्यांची एन्ट्री करण्यात आली. 'बिग बॉस 18'च्या फिनालेला 6 सदस्य होते. त्यातून पहिली ईशा, दुसरी चुम दरांग, तिसरा अविनाश मिश्रा आणि चौथा रजत दलाल हे सदस्य घराबाहेर पडले.

शेवटी टॉप २ मध्ये करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना हे सदस्य गेले. त्यातून करणवीर मेहराने 'बिग बॉस'ची ट्रॉफी उचलून विवियन डिसेनाला (Vivian Dsena) मात दिली आहे.

'बिग बॉस' टॉप 6

  1. विवियन डिसेना

  2. करणवीर मेहरा

  3. अविनाश मिश्रा

  4. रजत दलाल

  5. ईशा सिंह

  6. चुम दरांग

बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासून विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात भांडणे पाहायला मिळत आहे. प्रत्येक दिवशी यांच्यात वाद झाले आहेत. संपूर्ण सीझन हे दोघे एकमेकांच्या विरोधात बोले आहेत. मात्र आता बिग बॉसच्या घरातून बाहेर येताना पुन्हा यांच्यात मैत्रीची चाहूल लागल्याचे पाहायला मिळत आहे.

विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा हे दोन्ही स्पर्धक 'बिग बॉस 18'चे तगडे सदस्य होते. या दोघांनीही टिव्हीचे क्षेत्र खूप गाजवले आहे. यांच्या मालिका आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. 'बिग बॉस 18' ने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या शोने तीन महिने प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन केले आहे. बिग बॉसचे चाहते आता बिग बॉसच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT