Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Chahat-Rajat: 'बिग बॉस 18'सध्या चर्चेत आहे. घरात पुन्हा रजत आणि चाहतमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे. नेमकं कारण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' मध्ये (Bigg Boss 18) रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस गेम अधिक रोचक होत जात आहे. विवियन-करणवीर मेहरा , अविनाश-दिग्विजय यांसोबतच आता चाहत आणि रजतमध्ये देखील मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत.

बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये रजत (Rajat Dalal) आणि चाहतमध्ये (Chahat Pandey) भांडण पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता की ते दोघे एकमेकांना टोमणे मारत आहेत. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रजत चाहतला बोलतो की, "ही सर्व तुझ्या कर्माचे फळ आहे." यावर चाहतला खूप राग येतो आणि त्यांच्यात वाद सुरू होतो. चाहत रजतला बोलते की, "तू गप्प बस. तू काय करतोस? ट्विटरवर वर जेव्हा तू ट्रेंड करत होतास तेव्हा ते देखील तुझ्या वाईट कर्मांचे फळ होते." त्यावर रजत बोलतो की, "जेवढं तुझं डोक आहे, तसेच तुझ्यासोबत होणार आहे." यावर चाहत भडकून बोलते की,'तेरा-मेरा' करून बोलू नकोस. जो प्रेमाने बोलेल त्याला प्रेम मिळेल आणि द्वेषाने बोलणाऱ्याला भैस की पूछ..."

या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी करणवीर मेहरा, रजत दलाल, दिग्विजय राठी, चुम दारंग, श्रुतिका अर्जुन, कशिश कपूर आणि तिजेंदर बग्गा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यातून आता कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच टाइम गॉडसाठी रजत दलाल, शिल्पा शिरोडकर आणि चाहत पांडे यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT