Akshay Kumar's Emotional Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshay-Salman: अक्षय कुमारचा इमोशनल व्हिडिओ पाहून सलमान खान झाला भावूक, म्हणाला 'अक्की तू अमेझिंग आहेस'

सलमान खानने इमोशनल व्हिडिओ शेअर करत अक्षय कुमारचे कौतुक केले आहे.

Pooja Dange

Salman Shares Akshay's Emotional Video: बॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांची नेहमीच चर्चा होत असते. आता चर्चा होत आहे ती बॉलिवूडच्या दोन सुपरस्टारची. सलमान खान आणि अक्षय कुमार यांची मैत्रीविषयी सर्वांना माहित आहे. अक्षयला रडताना पाहून सलमान खान सुद्धा भावूक झाला आहे. सलमानने त्याच्या खास शैलीत अक्षय कुमारची तारीफ केली आहे.

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अक्षय कुमारचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार रडताना दिसत आहे. एका रिअॅलिटी शोदरम्यान बहिणीचा इमोशनल मेसेज ऐकल्यानंतर अक्षय कुमारला रडू लागला. तो त्याचे रडणे थांबविण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला अश्रू अनावर झाले.

सलमान खानने हा इमोशनल व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत अक्षय कुमारचे कौतुक केले आहे. सलमानने त्याच्या या स्टोरीवर 'मला असे काहीतरी मिळाले आहे, जे पाहून मला वाटले हे सर्वांसोबत शेअर करावे. देव तुला आशीर्वाद देवो अक्की. तू खरंच अमेझिंग आहेस. हा व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं. सुदृढ राहा, काम करत राहा. मी अशी अपेक्षा करतो की देव नेहमीच तुझ्यासोबत असेल. (Salman Khan)

सलमान खानचे हे प्रेम पाहून अक्षय कुमारने त्याचे आभार मानले आहेत. अक्षय कुमारने सलमानची स्टोरी त्याच्या इन्स्टाग्रामवर रिशेअर केली आहे. तसेच त्या स्टोरीवर लिहिले आहे की, तुझा मेसेजने माझे मन भरून आले आहे सलमान खान. खूप छान वाटलं. गॉड ब्लेस यु. चमकत रहा. (Akshay Kumar)

Instagram Story Of Salman Khan And Akshay Kumar

सलमान खान आणि अक्षय कुमारचे हे प्रेम पाहून फॅन्स सुद्धा खूप खुश झाले आहेत. फॅन्सना दोघांनी पुन्हा एकत्र काम करताना पाहायचे आहे. अक्षय कुमार आणि सलमान खान यांनी 'मुझसे शादी करोगी' आणि 'जान-ए-मन' या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

सलमान खान सध्या हिंदी बिग बॉस १६ होस्ट करत आहे. सलमान 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर ३' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर अक्षय कुमार 'माय गॉड २' मध्ये काम करणार आहे. तसेच अक्षय कुमार 'बडे मिया छोटे मिया'मध्ये दिसणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : पुण्यातील सर्व धरणे १०० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचे ‌₹१५०० मिळणार नाहीत; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

India Tourism : भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? मोजक्या लोकांना माहितीये

Ganesh Chaturthi 2025 : 'शंकराचा बाळ आला...'; गणेशोत्सवात भक्तीत व्हा दंग, वैशाली माडे यांचं नवीन गाणं रिलीज

BJP CM : भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर दिल्लीमध्ये हल्ला, जनता दरबारात कानाखाली मारली

SCROLL FOR NEXT