Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Salman Khan New Photo With Salim Khan : सलमान खानने नुकताच सोशल मिडियावर वडिलांसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचा जगात मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या दबंग स्टाईलने तो नेहमीच चाहत्यांना घायाळ करतो.

नुकताच भाईजानने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सलमान खानने आपल्या वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सलमान खान वडील सलीम खानच्या पहिल्या बाईकवर बसलेला पाहायला मिळत आहे. सलीम खान (Salim Khan) नेहमीच आपल्या आपल्या मुलाला भक्कम पाठिंबा देताना पाहायला मिळतात. हा बापलेकाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खानने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दिसत असलेली बाईक खूप खास आहे. कारण ती बाईक सलीम खान यांनी खरेदी केलेली आयुष्यातील पहिली बाईक आहे. त्या बाईकसोबत बापलेकाने खास फोटोशूट केलं आहे. सलमानने फोटो शेअर करताना खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "वडिलांची पहिली बाईक, ट्रायम्फ टायगर 100,1956" त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांच्या तसेच सेलिब्रिटींच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने तर "बाप ऑफ बॉलिवूड" अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्या एका युजरने "दबंग" असे लिहिले आहे. फोटोमध्ये सलमान खानने ग्रे टीशर्ट आणि ब्लू पॅन्टसोबत खास टोपी परिधान केलेली आहे. तर सलीम खान यांनी व्हाईट-ग्रे शर्ट आणि लाइट ब्लू पॅन्ट परिधान केली आहे. दोघ एकत्र फोटोमध्ये त्यांचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.

सलमान खान 'बिग बॉस 18' सोबतच त्याच्या आगमी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT