sikandar New song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sikandar New Song: 'सिकंदर'च्या प्रदर्शनाआधी 'हम आपके बिना' गाणं रिलीज; चित्रपटाची उत्सुकता वाढली

Hum Aapke Bina : सलमान खानच्या 'सिकंदर' या बहुचर्चित चित्रपटातील 'हम आपके बिना' चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. युथ फेव्हरेट अरिजीत सिंगने हे गाणं गायले आहे.

Shruti Vilas Kadam

Sikandar new Song: सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच उद्या प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या बहुचर्चित चित्रपटातील 'हम आपके बिना' चित्रपटाचे नवीन गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे खूपच भावनिक असून हे गाणे समीर अंजान यांनी लिहिले आहे आणि युथ फेव्हरेट अरिजीत सिंगने हे गाणं गायले आहे.

सलमान खानने गाणे पोस्ट केले

सलमान खानने हे गाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. गाणे शेअर करताना त्याने लिहिले की, 'हम तुम्हे बिना बिना हे गाणे रिलीज झाले आहे. 'सिकंदर' ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. सलमान खानने पोस्टमध्ये रश्मिका मंदान्ना, एआर मुरुगादोस आणि साजिद नाडियाडवाला यांना टॅग केले आहे. याआधी सिकंदरची तीन गाणी रिलीज झाली आहेत. पहिले गाणे 'जोहरा जबीन', दुसरे गाणे 'बम बम भोले' आणि तिसरे गाणे 'सिकंदर नाचे' होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रत्येक गाण्याने खळबळ उडवून दिली आहे.

'सिकंदर'चा नवीन गाणे प्रदर्शित

'सिकंदर' चित्रपटातील चौथ गाणे 'हम आपके बिना' आहे. याला आवाज दिला आहे अरिजित सिंगने, त्याने यापूर्वी सलमान खानसोबत 'टायगर ३' (२०२३) मध्ये काम केले होते. सलमान आणि रश्मिकाची क्युट केमिस्ट्रीला अरिजितच्या आवाजाने चारचाँद लावले आहेत.

'सिकंदर'चे' बद्दल

ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' हा चित्रपट खास असणार आहे. या चित्रपटात सलमान खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे, पहिली भूमिका 'सिकंदर'ची आणि दुसरी भूमिका 'संजय राजकोट'ची. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात काजल अग्रवालची भूमिका आहे. याशिवाय शर्मन जोशी, प्रतीक बब्बर आणि सुनील शेट्टी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cataract surgery: मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 4 रुग्णांच्या डोळ्यांना संसर्ग, दृष्टीवर परिणाम; नेमकं काय घडलं?

Sweet potato benefits : रताळे खाण्याचे हे आहेत ५ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मावळमध्ये अनधिकृत स्टोन क्रशरविरोधात टाकवे मधील ग्रामस्थांचा एल्गार

Fact Check: महाराष्ट्र सरकारने सुरू केली 'ब्युटी पार्लर किट सहाय्य योजना', काय आहे सत्य?

Aadhaar Card : आधार कार्ड जवळ नसेल तरी चिंता नको! अवघ्या 1 मिनिटात मोबाईलवर करा डाउनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT