Salman Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'या दु:खाच्या काळात'; पहलगाम हल्ल्यामुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला...

Salman Khan: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात अभिनेता सलमान खानने आपल्या युनायटेड किंगडम (UK) दौरा रद्द केला आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात अभिनेता सलमान खानने आपल्या युनायटेड किंगडम (UK) दौरा रद्द केला आहे. सलमान खानने या निर्णयाची घोषणा करताना स्पष्टपणे सांगितले की, “या दु:खाच्या काळात थांबणं आणि थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे.” चाहत्यांनीही त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.

सलमान खानचा हा यूके दौरा जून महिन्यात होणार होता, त्याचे लंडन, बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर शहरांतील कार्यक्रम होणार होते. अनेक दिवसांपासून या टूरची तयारी सुरु होती आणि मोठ्या प्रमाणात तिकिट विक्री देखील सुरु आहे. मात्र, देशातल्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि जनतेच्या भावना लक्षात घेता, सलमानने आपल्या टीमसोबत चर्चा करून हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या टीमने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “सलमान खानला वाटतं की या काळात उत्सव साजरा करणं योग्य नाही.”

सलमान खान यांचं देशप्रेम आणि सामाजिक जाणीव यापूर्वीही अनेकवेळा दिसून आली आहे. त्याने कोविड काळात केलेली मदत, गरीबांसाठी विविध उपक्रम राबवले होते. सोशल मीडियावरही त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. युनायटेड किंगडममधील आयोजकांनी देखील सलमान खानच्या या निर्णयाचा आदर केला असून लवकरच दौऱ्याच्या नव्या तारखा जाहीर करण्यात असल्याचे सांगितले आहे.

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच तो सिकंदर या चित्रपटात दिसला होता. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली नसली तरी या चित्रपटाची गाणी प्रक्षकांना आवडली आहेत. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखचं सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT