Yentamma New Song From Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan YouTube: Zee music Video
मनोरंजन बातम्या

Salman Khan New Song: 'लुंगी डान्स' नंतर 'उठा कारके लुंगी' गाणे होणार व्हायरल; 'किसी का भाई किसी की जान'मधील गाणे प्रदर्शित

'Yentamma' Song From Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 'किसी का भाई किसी की जान' मधील 'येंटम्मा' हे गाणे हिंदी-तेलुगू फ्युजन आहे.

Pooja Dange

Yentamma New Song: सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' सध्या चर्चेत आहेत. या चित्रपटातील एकामागून एक गाणी प्रदर्शित होत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील 'येंटम्मा' या गाण्याच्या काल टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. नुकतेच हे गाणे देखील प्रदर्शित झाले आहे.

'येंटम्मा' गाण्यामध्ये सलमान खान आणि व्यंकटेश लुंगीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. याआधी चित्रपटातील रोमँटिक गाणे 'नईयो लगदा' आणि पंजाबी गाणे 'बिल्ली कॅट' लोकांना आवडले होते.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'बथुकम्मा' गाणे प्रदर्शित झाले, जे लोकांना खूप आवडले. तेलंगणातील संस्कृतीचे दर्शन या गाण्यातून घडत आहे.

'किसी का भाई किसी की जान' मधील 'येंटम्मा' हे गाणे हिंदी-तेलुगू फ्युजन आहे. या गाण्याचे बोल आहे 'नाचेंगे सब उठा कारके लुंगी' आहेत. गाण्यात व्यंकटेश आणि सलमानसह पूजा हेगडे देखील दिसत आहेत.

या गाण्याची सुरुवात सलमान, व्यंकटेश आणि पूजा यांच्या शॉटने होते. त्यानंतर बुलेटवर सलमान आणि व्यंकटेश दिसतात आणि गाणे पुढे जाते. 'येंटम्मा' हे गाणे देखील इतर गाण्यांप्रमाणे भव्यदिव्य आहे.

सलमानच्या चित्रपटामध्ये राम चरण दिसणार अशी चर्चा होती. अखे या गाण्याच्या प्रदर्शनानंतर पूर्णविराम लागला आहे. कारण राम चरण या गाण्यात एन्ट्री केली आहे. काल टीझर प्रदर्शित झाल्यानंतर एका सीनची चर्चा होती आणि त्यात दिसलेली व्यक्ती राम चरण आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

राम चरण आणि व्यंकटेश यांनी गाण्यात जबरदस्त डान्स केला आहे. तर सलमान देखील त्याच्या डान्सने साऱ्यांचे लक्ष वेधीं घेत आहे. किसी का भाई किसी कि जान चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्की करेल. चित्रपट 21 एप्रिल 2023 रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

'यंतम्मा' गाणे पायल देव यांनी संगीतबद्ध केले आहे. हे विशाल ददलानी आणि पायल देव यांनी गायले आहे आणि रफ्तारने रॅप केले आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांचे असून नृत्य दिग्दर्शन जानी मास्टर यांचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगावात किराणा दुकानातून गांजाची विक्री

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT