salman khan saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan : अन् 'दबंग' सलमान खान मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातून पडला बाहेर (व्हिडिओ पाहा)

आज अचनाक सलमान खान पाेलिस आयुक्त कार्यालयात आल्याने काही पाेलीसांनी त्याच्या समवेत सेल्फी काढला.

साम न्यूज नेटवर्क

मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) याने आज (शुक्रवार) मुंबई पाेलिस आयुक्त विशाल फणसकर (Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar) यांची भेट घेतली. उभयत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर सलमान खानने पाेलिस आयुक्त कार्यालयातून (mumbai) बाहेर पडला. त्यावेळी माध्यमांनी त्याला गाठत प्रश्नांचा भडिमार केला. परंतु एक शब्दही न बाेलताना ताे घटनास्थळावरुन रवाना झाला. (Salman Khan News)

प्राथमिक माहितीनूसार सलमान खान याने वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज दाखल केला हाेता. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपुर्वी धमकीचे पत्र आलं हाेते.

या पत्रात “तुम्हारा मूस वाला कर देंगे” असं लिहिलं हाेते. सिद्धू मुसेवालाच्या खूनानंतर काही दिवसांतच सलमान आणि त्याच्या वडील सलीम खान यांना धमकी मिळाल्याने सलमानच्या सुरक्षेत पाेलिसांनी वाढ केली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IIT पवईच्या बाहेर वंचितचा आंदोलन

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार? सरकारकडून हालचालींना वेग; 7 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा, बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश

T20 Ranking: टी २० रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टॉप ५ मध्ये २ तडाखेबंद फलंदाज

Skin Care: ग्लोइंग आणि मॉइश्चराइज स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'ही' नाईट क्रीम; ५ दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT