Salman khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman khan: सलमान खानच्या जीवाला धोका; आधी धमक्या येत होत्या, आता तर अपार्टमेंटमध्येच एक जण घुसला!

Salman khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्तीने घुसल्याची घटना समोर आली आहे. यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Salman khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्तीने घुसल्याची घटना समोर आली आहे. या घुसखोरीमुळे सलमान खानच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपास सुरू केला आहे .

सध्याच्या घुसखोरीच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी गॅलक्सी अपार्टमेंटच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच, सलमान खानच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनांमुळे सलमान खानच्या सुरक्षेवर सतत धोका निर्माण होत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमक्यांमुळे आणि घरावर झालेल्या गोळीबारामुळे सलमान खानची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

काही महिन्यापूर्वी अभिनेता सैफ अली खानच्या घरात देखील असाच एक अज्ञात व्यक्ती घुसून सैफ अली खानवर गंभीर वार केले होते. यासाठी त्याने शाहरुख खानच्या घराजवळ रेखी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. आता सलमान खानच्या घरी देखील एक अज्ञात व्यक्ती घुसल्याने कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT