Shruti Kadam
मराठीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये प्राजक्ताने गडद तपकिरी रंगाची साडी नेसली आहे.
या साडीवर तिने कोल्हापूरी साज घातला असून त्यावर नथ घातली आहे.
तसेच प्राजक्ताने तिच्या ‘प्राजक्तराज’ ब्रॅण्डचे शिंदेशाही तोडे, गहू तोडे, तारामंडळ, एकदाणी, नागोत्र, कंबरपट्टा, कुडी, अंगठी हे दागिने परिधान केले आहेत.
याचसह तिने तिच्या लूकला साजेसा मेकअप करुन चंद्रकोर कुंकू लावून तिचा लूक पूर्ण केला आहे.
या फोटोवर प्राजक्ताने ‘मन अन् भोवताल दोन्ही चिंब पावसाळी… (ऐन मे मध्ये) पण पावसाळा आपल्याला आवडतोच… त्यामुळे काही हरकत नाही’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
निखळत्या पाण्यातील प्रतिबिंबालाही तुझाच मोह जडावा, इतकी सुंदर दिसत आहेस तू अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.