Salman Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणात महत्वाची अपडेट; राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक

Salman Khan House Firing Case : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे.

Chetan Bodke

सलमान खानच्या घरावर गेल्या महिन्यामध्ये गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता मुंबई पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे.

विक्की चौधरी, सागर पाल, सोनू चंदर आणि अनुज थापन यांना पोलिसांनी अटक केलेले होते. आज सकाळी मुंबई गुन्हे शाखेने पाचव्या आरोपीला अटक केलेली आहे. त्या आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. याला आज राजस्थानवरून पोलिसांनी अटक केली असून त्याने गोळीबार करणाऱ्यांना मदत पुरवण्याचे काम त्याने केलेले आहे.

भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. काही वेळातच मुंबई गुन्हे शाखेचं पथक आरोपीला घेऊन मुंबईत येणार असल्याची सध्या माहिती आहे. या प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सध्या पोलिस कोठडीमध्ये तीन आरोपी आहेत. १ मे रोजी आरोपी अनुज थापर ह्याने मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्ये आत्महत्या केली होती.

विक्की आणि सागरला पोलिसांनी गुजरातच्या भूजमधून अटक केली होती. तर सोनू आणि अनुजला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली होती. आता पाचव्या आरोपीला पोलिसांनी राजस्थानवरून अटक केली आहे. मोहम्मद चौधरीने सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याने, विकी आणि सागरला पैशांची मदत केल्याचा आरोप त्यावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT