Salman Khan's Gym Fire Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan's Gym Fire: सलमान खानच्या जिमला भीषण आग; नेमकं काय घडलं?

Salman Khan's Gym Fire: दिल्लीतील ग्रेटर कैलाश-१ येथील सलमान खानच्या जिम ब्रँडशी संबंधित फ्रँचायझीमध्ये आग लागली. पोलिसांनी सर्वांना सुरक्षित बाहेर काढले असून, शॉर्ट सर्किटचा संशय व्यक्त केला जात आहे.

Shruti Vilas Kadam

Salman Khan's Gym Fire: बॉलिवूडचा दबंग सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. बॉडी डबल म्हणून काम करणाऱ्या कलाकाराला हार्ट अटॅकनंतर आता त्याच्या दिल्लीतील जिमला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी, २० ऑगस्ट रोजी रात्री दिल्लीतील ग्रेटर कैलाश-१ परिसरातील एम ब्लॉक मार्केटमध्ये ही घटना घडली. रात्री सुमारे १० वाजून १५ मिनिटांनी जिमच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली.

आगीची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी जिममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम ब्लॉक मार्केटमधील ही जिम सलमान खानच्या जिम ब्रँडअंतर्गत चालवली जाते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझवल्यानंतर परिसराची पाहणी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचेही अद्याप समोर आलेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे.

सलमान खानचं पुढील काम

दरम्यान, सलमान खान सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. 'सिकंदर'नंतर अभिनेता त्याच्या पुढील कामांवर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 'बिग बॉस २०'च्या सूत्रसंचालनासाठीही तो सज्ज होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पहिली योजना बंद

Maharashtra News Live Update:विनर्स ॲकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई होणार

Latest Mangalsutra For Woman: नव्या नवरीसाठी फॅन्सी मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदी करण्याआधी वाचा 18K, 22K आणि 24K च्या किंमती

Weight Loss: सकाळ की संध्याकाळ? वजन कमी करण्यासाठी व्यायामाची योग्य वेळ कोणती? ५ आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT