Salman Khan Galaxy Apartment Firing Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan on Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोइच्या धमकीवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला; मनातलं सर्वच सांगितलं

Salman Khan Galaxy Apartment Firing: सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईनेच माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं त्याने सांगितले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी सलमान खानने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईनेच मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे मला वाटत आहे, असं सलमान खानने पोलिसांना सांगितले आहे. १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या निवासस्थानी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींना देशभरातून अटक केली होती

मुंबई गुन्हे शाखेने याबाबत सलमान खानचा जबाब नोंदवला आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, सलमान खानने पोलिसांना सांगितले की, मला वाटते की लॉरेन्स बिश्नोईने मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्यासाठी गोळीबाराचा आदेश दिला होता. याआधीही सलमान खान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा जबाब नोंदवण्यात आला होता.

मुंबईतील विशेष न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने सांगितले की, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरोधात पुरेशी नोंद आहे. आरोपींवर इतरही अनेक गुन्हे दाखल आहे.याप्रकरणी आता अजून तपासणी सुरु आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींनी मंदिरातून अटक केली होती. आरोपींनी सर्वप्रथम सलमान खानच्या पनवेलमधील फार्महाउसची पाहणी केली होती. त्यानंतर महिनाभर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर लक्ष ठेवले होते. त्यानंतर सलमान खानच्या घरावर गोळीबार केला. याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT