Salim Khan Health Update  saam tv
मनोरंजन बातम्या

Salim Khan Health Update : सलमानचे वडील व्हेंटिलेटर; सलीम खान यांच्यावर होणार शस्त्रक्रिया, वाचा हेल्थ अपडेट

Salman Khan Father Salim Khan Hospitalized : सलमान खानचे वडील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shreya Maskar

सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सलमान खानच्या वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

सलीम खान यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे वडील प्रसिद्ध अभिनेते आणि पटकथा लेखक सलीम खान सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक पाहायला मिळत आहे. ते सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात एडमिट आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सलीम खान यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया देखील होणार आहे.

सलीम खान 90 वर्षांचे आहेत. मंगळवारी सकाळी त्यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याचे निदान झाले आहे. उपचारा दरम्यान सुरुवातीला त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आता प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच रक्ताची गाठ काढण्यासाठी सलीम खान यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

डॉक्टर सलीम खान यांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. तसेच त्यांचे हेल्थ अपडेट देत आहेत. खान कुटुंबाचे चाहते आणि कलाकार, मित्र मंडळी सलीम खान लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत आहेत. सलीम खान यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच खान कुटुंब तसेच बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली. सलमान खान देखील आपले चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावर सोडून तातडीने रुग्णालयात पोहोचला.

सलीम खान यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान आहे. ते प्रसिद्ध पटकथा लेखक आणि अभिनेते आहेत. त्यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून 'शोले', 'दीवार', 'जंजीर' आणि 'मिस्टर इंडिया' यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली. सलीम खान यांनी 1960 मध्ये रिलीज झालेल्या 'बारात' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाण्यात अपघाताचा थरार; टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटला, कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळली

मोठं कुटुंब, मोठा पगार? 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन?

Pune Crime: स्कुटर थांबवली, धक्का देऊन खाली पाडलं अन्...! दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचं अपहरण, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भोपळे चौकात इमारतीला आग

Jeera Rice Recipe : कुकरच्या २ शिट्ट्या अन् हॉटेलसारखा मोकळा जीरा राइस तयार, 'हा' सीक्रेट पदार्थ टाका रेसिपीत

SCROLL FOR NEXT