Salman Khan saam tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan : आता सलमान खानच्या जवळच्या नातेवाईकाला जीवे मारण्याची धमकी, ईमेल केला अन्...

Salman Khan Relatives Receives Threat From Bishnoi Gang : सलमान खानचे जवळचे नातेवाईक अडचणीत सापडले आहेत. त्यांना बिश्नोई गँगकडून धमकी आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अलिकडेच रोहित शेट्टी, रणवीर सिंगला बिश्नोई गँगकडून धमकी आली.

आता सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला बिश्नोईगँग कडून धमकी आली आहे.

सलमानच्या जवळच्या व्यक्तीला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

सिनेसृष्टीतून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिश्नोई गँगकडून सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून खंडणीची धमकी आहे. धमकीनंतर पोलीसांनी सलमान खान आणि त्याच्या नातेवाईकांची सुरक्षितता वाढवली आहे. सलमान खानला आधीही बिश्नोई गँगकडून थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्या होत्या. तसेच त्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती.

गेल्या काही दिवसांत अनेक मोठ्या आर्थिक उलाढाली होताना दिसत आहेत. या प्रकरणाचा पोलीस बारकाईने तपास घेताना दिसत आहे. तसेच बिश्नोई गँगच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. या सर्वामुळे कलाकारांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा राहीला आहे. सलमान खानचा हा जवळचा व्यक्त उद्योग क्षेत्राशी संबंधित आहे. त्या व्यक्तीला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा ईमेल आला आहे. पाठवणाऱ्याने स्वतःला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ईमेलमध्ये मोठ्या रकमेची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करत आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा फिल्मी कलाकारांवर डोळा

एका मागोमाग बॉलिवूडचे कलाकार बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आल्यामुळे बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच खंडणीसाठी सेलिब्रिटींचा वापर केला जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून गोळीबार झाला होता.

कालच रणवीर सिंगला देखील बिश्नोई गँगकडून धमकी आल्याची माहिती मिळाली आहे. रणवीर सिंगला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही धमकी व्हॉट्सअॅपवर व्हॉइस नोटद्वारे पाठवण्यात आली होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच रणवीर सिंहची आणि अभिनेत्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांना वारंवार धमक्या मिळत असल्यामुळे फिल्मी जगतात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach Gas Problem: पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी काय करावे?

Maharashtra Live News Update: हिंगोलीत पोलिस भरतीला सुरुवात

Besan Halwa : महाशिवरात्रीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट बेसन हलवा, वाचा सोपी रेसिपी

Marathi Famous Couple : "प्रेमाला हळदीचा रंग लागला..."; प्रसिद्ध मराठी जोडपं लवकरच अडकणार लग्न बंधनात, पाहा PHOTOS

अमेरिकेकडून 'कापूस'कोंडी! बांगलादेशला फक्त ० टक्के, तर भारतावर १८ टक्केंचे आयत शुल्क

SCROLL FOR NEXT