Bigg Boss 18  yandex
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : ५५ वर्षीय अभिनेत्रीने 'बिग बॉस'ची ऑफर धुडकावली; अक्षय-मिथुनच्या चित्रपटात होती मुख्य अभिनेत्री

या अभिनेत्रीने धुडकावली सलमानच्या बिग बॉसची ऑफर : दिसणार का बिग बॉस 18 मध्ये ?

Sneha Dhavale

बिग बॉस हा रिअलिटी शो जेव्हापासून भारतात सुरु झाला तेव्हापासून आजपर्यंत या शोनं बराच प्रेक्षकवर्ग कमावला आहे. बिग बॉस आणि सलमान खान हे आता एक समीकरणच झालंय. सलमान खानने 2010 पासून 'बिग बॉस' होस्ट करायला सुरुवात केली. आता सलमान बिग बॉस 18 घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 6 ऑक्टोबरला सलमान बिग बॉस 18 द्वारे प्रेक्षकांसमोर येतोय. बिग बॉस 18 चा पहिला प्रोमोसुद्धा आला आहे.

दरवेळी बिग बॉसचा प्रत्येक सिझन येणार असं कळताच नवनवीन चर्चा सुरु होतात. मग त्यात शो कोण होस्ट करणार ? बिग बॉसचं घर कसे असणार आहे. कोणते गेम्स आणि टास्क स्पर्धकांच्या वाट्याला येणार आहेत, कोणता नवा ड्रामा, ट्विस्ट बघायला मिळणार आहे, अशी चर्चा नेहमीच रंगते.

सर्वात जास्त चर्चा दर सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत, कोणाच्या नावाची चर्चा आहे, याची असते. बिग बॉसच्या या अठराव्या सिझनमध्ये निया शर्मा असेल अशा बातम्या तर गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. पण त्याचबरोबर शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थळे, सायली सोलंकी, चाहत पांडे, शहजाद धामी, यांची नावं चर्चेत आहे. या सगळ्यासोबतच एका काळची बॉलीवूड अभिनेत्री आणि अक्षय कुमारची पहिली कोस्टार शांती प्रिया हिलाही सलमानच्या शोची ऑफर मिळाली असल्याचं समजतंय.

बिग बॉसच्या घरात आपल्याला संधी मिळाली अशी अनेक सेलिब्रिटीजची इच्छा असते. अभिनेत्री शांती प्रिया हिलाही या शोसाठी विचारण्यात आलं. पण तिनं या शोमध्ये सहभागी होण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. हि तीच शांती प्रिया आहे जी एकाकाळी अक्षय कुमारची नायिका म्हणुन 'सौगंध' सिनेमामध्ये झळकली होती. शांती प्रियानं स्वत: तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्टद्वारे आपल्याला बिग बॉस 18 मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली असल्याचं सांगितलं आहे. आपल्या बिग बॉसमधील सहभागाबाबत सगळीकडे उलटसुलट चर्चा होत आहेत. पण, आपण बिग बॉस 18 मध्ये सहभागी होणार नाही असं तिनं म्हटलं आहे. तसंच आपल्याला मिळणाऱ्या समर्थनाबद्दल तिनं फॅन्सचे आभारही मानलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT