Riteish Deshmukh Raja Shivaji Salman Khan and sanjay dutt Saam tv
मनोरंजन बातम्या

Raja Shivaji: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजू-सलमानची जोडी; साकारणार 'ही' खास भूमिका

Riteish Deshmukh Raja Shivaji: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त आता मराठी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामध्ये खास भूमिका साकारणार आहे.

Shruti Vilas Kadam

सलमान खान आणि संजय दत्त आता मराठी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार

अभिनेता रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये साकारणार खास भूमिका

२०२५ च्या उत्तरार्धात चित्रपट होणार प्रदर्शित

Ritesh Deshmukh Raja Shivaji: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि संजय दत्त आता मराठी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या भव्य ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामध्ये सलमान खान छत्रपती शिवाजी महाराजांचे वीर सेनानी जीवा महाला यांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका सलमानच्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीतली पहिली ऐतिहासिक भूमिका असणार आहे.

या चित्रपटात रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेता संजय दत्त खलनायक अफजल खानच्या रूपात दिसणार आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात शिवाजी महाराज आणि अफजल खानचा ऐतिहासिक संघर्ष दाखवला जाणार आहे. त्यामध्ये जीवा महालाने अफजल खानाच्या पलायनादरम्यान दिलेले शौर्यपूर्ण योगदान दाखवले जाईल.

मीडिया अहवालानुसार, सलमान खानने आपल्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचे शेड्यूल सुरू होणार आहे. या सीनसाठी खास ऐतिहासिक सेट उभारण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात ॲक्शन सिक्वेन्सेस आणि पारंपरिक शस्त्रांचा वापर केला जाणार आहे. या भूमिकेसाठी सलमानने खास ट्रेनिंग घेतल्याचेही बोलले जाते.

रितेश देशमुखने या चित्रपटाची घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी केली होती. ‘राजा शिवाजी’ हा त्याचा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. संजय दत्तचा अफजल खानचा अवतार या चित्रपटातील मुख्य आकर्षण ठरणार असून, त्याच्या व सलमान खानच्या संघर्षाच्या दृश्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून, २०२५ च्या उत्तरार्धात त्याचे प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT