Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, २० वर्षाच्या तरुणाला नोएडातून अटक

Salman Khan Death Threat Call: अभिनेता सलमान खानला आता पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी आली आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता सलमान खानला आता पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी आली आहे. अभिनेता सलमान खानसह आमदार झिशान सिद्धीकीला देखील मारण्याचा डाव आहे. शुक्रवारी आमदार झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता. अशातच झीशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना धमकी देणाऱ्याला तरूणाला अटक करण्यात आली आहे.

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमान खानला सतत जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच आता बाबा सिद्धीकींचा मुलगा, आमदार झिशान सिद्धीकी आणि सलमान खान यांना धमकी मिळाली आहे. झिशान सिद्धीकीच्या वांद्रे येथील ऑफिसमध्ये या धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. फोनवरून संबंधित व्यक्तीने झिशान सिद्धीकी आणि सलमान खानला मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली आहे. दरम्यान यासंबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पोलिसांकडून धमकीचा तपास सुरू आहे.

याच महिन्यात १२ ऑक्टोबरमध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोईने बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली होती. सलमान खानला सतत येणाऱ्या धमक्यानंतर आता झिशान सिद्धीकीला देखील मारण्याची धमकी आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT