Rakhi Gets Threats From Bishnoi Gang
Rakhi Gets Threats From Bishnoi Gang Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Mail: दबंग खाननंतर ड्रामा क्विनच्या जीवाला धोका; बिश्नाई गँगने दिली राखीला धमकी...

Chetan Bodke

Rakhi Gets Threats From Bishnoi Gang: गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा दबंग सलमान याला लॉरेन्स बिश्नोईकडून मेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. अशातच पुन्हा एकदा बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत हिला सुद्धा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

लॉरेन्स बिश्नोईकडून राखीला मेलमध्ये, आम्ही सलमान खानला बॉम्बेने मारून टाकू, तू (राखी सावंत) त्यात अडकू नकोस, अन्यथा तू सुद्धा एके दिवशी अडचणीत येईल, असं म्हटलंय.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सलमानला अशी धमकी देण्यात आली होती. मात्र सलमानशी संबंधित या धमकीमध्ये राखी सावंतलाही पहिल्यांदाच धमकी देण्यात आली आहे.

आज सकाळी राखी सावंतच्या मेलवर तिला एक अनोख्या व्यक्तीचा मेल आला. मेल उघडल्यावर त्यात अभिनेता सलमान खान आणि राखी सावंत यांना जीवे मारण्याच्या धमक्या होत्या. हा मेल गुर्जर प्रिन्स नावाच्या व्यक्तीने पाठवला आहे, जो लॉरेन्स बिश्नोई ग्रुप/गोल्डी ब्रार ग्रुपचा असल्याचा दावा करत आहे. मेलमध्ये लिहिले की, “ जय बलकारी, राखी आमची तुझ्या सोबत काही बोलणं झालेलं नाही, सलमान खानच्या प्रकरणात तू अडकू नकोस, नाही तर तू सुद्धा याच्यात अडकशील.”

तर पुढे मेलमध्ये लिहिले आहे की, “आम्ही तुझा भाऊ सलमानला बॉम्बनेच उडवून देऊ, त्याने कितीही सुरक्षा वाढवली तरी, त्याला आम्ही बरोबर उडवून देऊ. राखी तू या प्रकरणात नको पडूस, ही तुझ्यासाठी अखेरची ताकिद आहे. ” राखीला बिश्नोई गँगकडून दोन वेळा मेल आला आहे, एकदा सकाळी ७: २२ आणि दुसरा मेल दुपारी १: १९ ला पाठवण्यात आला.

सलमानला लॉरेन्स बिश्नोईने एका मुलाखतीतून खुलेआम धमकी दिली होती. यावरून राखीने सलमानकडून समस्त बिश्नोई समाजाची माफी मागितली होती. तेव्हा तिने समाजाची कान पकडून माफी मागितली होती. त्यानंतर सलमानला बिश्नोई गँगकडून 10 एप्रिल रोजी फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. फोन करणार्‍याने ३० एप्रिलला सलमान खानला मारणार असल्याचे सांगितले. हा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

Special Report | ..तर पक्ष फुटला असता! शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT