Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: 'तेरे नाम २.०...';' सलमानचा नवा लूक पाहून आमीर-करिनाला बसला धक्का, व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल राधे

Salman Khan: बॉलिवूडमधील गाजलेल्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती अभिनेता सलमान खान यांच्या नव्या हेअरस्टाइलची.

Shruti Vilas Kadam

Salman Khan: बॉलिवूडमधील गाजलेल्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेता आमीर खान, अभिनेत्री करीना कपूर खान, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा रंगली ती अभिनेता सलमान खान याच्या नव्या हेअरस्टाइलची.

‘लगान’च्या २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित करण्यात आलेला हा सोहळा आठवणींनी भरलेला होता. चित्रपटाचे कलाकार, निर्माते आणि तांत्रिक टीम पुन्हा एकत्र आल्याने चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात सलमान खानने अचानक एन्ट्री करताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. यावेळी सलमान छोट्या केस आणि ब्लॅक पॅन्ट व ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे.

कार्यक्रमातील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर सलमानकडे आश्चर्याने पाहत आहेत. सलमानचा हा लूक पाहून अनेकांना त्याच्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील ‘राधे’ या लोकप्रिय पात्राची आठवण झाली.

हा व्हिडिओ पाहून नेटकरी कमेंट करत आहेत. एकाने लिहले, 'तेरे नाम २ लवकरच येत आहे' आणखी एकाने लिहिले, किंग इज गेटिंग ऑल्ड, आणखी एकाने लिहले, “काहीतरी मोठं येणार आहे”. मात्र हा नवा लूक नेमका कोणत्या प्रोजेक्टसाठी आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT