Salaar Trailer Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Twitter Review: प्रभास इज बॅक! 'सालार'चा ट्रेलर रिलीज; अभिनेत्याचा लूक पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Salaar Trailer: प्रभासच्या सालार चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Salaar Trailer Review:

गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर 'सालार' चित्रपटाची खूप चर्चा आहे. साउथ सुपस्टार प्रभासच्या या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रभासची जादू बॉक्स ऑफिसवर फार चालली नाही. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकणार की नाही हे पाहणे उत्सुकतेच ठरणार आहे.

प्रभासच्या सालार चित्रपटाचा ट्रेलर (Salaar Trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर ट्विटर रिव्हीव (Review) द्यायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. (Entertainment News In Marathi)

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. चित्रपटात हजारो वर्षांपूर्वी खानसार जंगलातील भयानक डाकूची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात दोन मित्रांमधील कथा पाहायला मिळणार आहे.

ट्रेलरविषयी सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. नेटकऱ्यांनी ट्रेलरला दमदार असल्याचे म्हटले आहे तर काहींनी ट्रेलर आवडला नसल्याचे सांगितले आहे.

एका युजरने सालारच्या ट्रेलरला क्रिंज म्हटले आहे. तर काहींना ट्रेलरच्या शेवटी प्रभासचा इंग्रजीतील डायलॉग आवडलेला नाही. अनेकांनी प्रभासच्या डायलॉगची खिल्ली उडवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर अपेक्षापेक्षा खूप वाईट असल्याचे म्हटले आहे. चित्रपटाविषयी अनेक मीम्सदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याचसोबत अनेकांनी ट्रेलरला पसंती दर्शवली आहे. 'सालार' दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत इतिहास घडवेल, असे एका युजरने लिहले आहे. तर ट्रेलर ट्रेंडिगला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. चित्रपटाचे ब्रकग्राउंड अनेकांना आवडल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी 'प्रभास इज बॅक' असं म्हटलं आहे. तसेच श्रृती हसनच्या भूमिकेचेही कौतुक होताना दिसत आहे.

सालार चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप जास्त उत्सुकता आहे. चित्रपट २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात प्रभास आणि श्रृती हसन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदी या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT