ARBAZ SHAIKH COMPLAINT LEADS TO FDA ACTION, NOBEL HOSPITAL PHARMACY SHUT IN SOLAPUR Saam Tv
मनोरंजन बातम्या

Solapur : "वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची..", सैराट फेम अभिनेत्याने डिलीट केलेल्या व्हिडिओबद्दल दिलं स्पष्टीकरण

Solapur Hospital Actor Arbaz Shaikh’s News : ‘सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेख यांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल फार्मावर कारवाई केली.

Alisha Khedekar

  • ‘सैराट’ फेम अरबाज शेखने औषध खरेदीसाठी सक्ती केल्याचा आरोप

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर FDA ने तातडीने चौकशी सुरू केली

  • नोबेल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल फार्मा तात्पुरते बंद

  • संबंधितांना कारणे दाखवा नोटीस

  • व्हिडिओ हटवत अरबाज शेखने वडिलांच्या प्रकृतीला प्राधान्य असल्याचे सांगितले

सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. 'सैराट’ फेम अभिनेता अरबाज शेख याने आपल्या वडिलांच्या उपचारादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच तो डिलीट करण्यात आला. दरम्यान तो व्हिडिओ का डिलीट करण्यात आला याबाबत अभिनेत्याने दुसरी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. अरबाज शेखला झालेल्या मनस्तापाची दखल अन्न व औषध प्रशासनाने (FDA) घेतली असून नोबेल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल फार्मा तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

अरबाज शेख याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज आणि हृदयविकाराच्या उपचारासाठी सोलापूरातील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून औषधे आणि इंजेक्शन्स रुग्णालयातीलच मेडिकलमधून खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्याने व्हिडिओद्वारे केला होता. तसेच बाहेरील मेडिकलमध्ये तीच औषधे जवळपास अर्ध्या किमतीत उपलब्ध असल्याचा दावाही त्याने केला होता. व्हिडिओमध्ये अरबाजने सांगितले होते की, सुरुवातीला १० हजार रुपयांचे डिपॉझिट भरल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात औषधांची यादी देण्यात आली. बाहेरून औषधे आणण्याची परवानगी मागितल्यानंतर ती नाकारण्यात आली आणि रुग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करण्यास सांगितले गेले. यामुळे उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप त्याने केला.

या व्हिडिओनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर नोबेल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकल फार्मा बंद करण्यात आले असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत मेडिकल चालकाचे म्हणणे नोंदवले जाणार असून त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर छाननी केली जाणार आहे. दोष सिद्ध झाल्यास कारवाई होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी, हॉस्पिटलच्या फार्मा बद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला होता. रुग्णांची औषध हॉस्पिटलच्या फार्मामधूनच घेणे हा सर्वस्वी निर्णय रुग्णांच्या नातेवाईकांचा असेल. त्यांच्यावर कोणतीही बंधन लादता येणार नाहीत. असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असं असतानाही सोलापूरच्या संबंधित हॉस्पिटलने नियम भंग केले आहेत.

दरम्यान, कारवाईनंतर अरबाज शेखने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला आहे. सर्व स्तरांतून मिळालेल्या मदतीबद्दल आभार मानताना त्याने “माझ्या वडिलांची प्रकृती माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे आणि हा विषय माझ्यासाठी इथेच संपला आहे,” असे म्हटले आहे. या प्रकरणात नोबेल हॉस्पिटलसह प्राईड हॉस्पिटल, हृदयम हॉस्पिटल आणि सीएनएस हॉस्पिटल यांनाही अन्न व औषध प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून पुढील चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई, सिद्धेश्वर दूध डेअरीवर धाड; ३५०० लिटर दूध पावडर जप्त

Shreyas Iyer: टर्निंग पॉइंट की ब्लंडर? श्रेयस अय्यरच्या एका चुकीने भारताने गमावला सामना; कर्णधाराने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Maharashtra News Live Update: परशुराम घाटा गॅबियन वॉलला तडे, दरड कोसळण्याची भीती

Latur Crime: लातूर हादरले! राहत्या घरात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, गळ्यावरून चाकू फिरवला

Maharashtra Weather : मान्सूनने संपूर्ण देश व्यापला! राज्यात आजही मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT