Saif Ali Khan Attack Bishnoi Connection: Google
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan Attack: सैफवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? सैफवरील हल्ल्याचं बिश्नोई कनेक्शन?

Saif Ali Khan Attack Bishnoi Connection: सलमान खाननंतर आता सैफ अली खानही गँगस्टार लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. बिश्नोई गँगचं नेमकं काय कनेक्शन आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला झालाय. त्यामुळे अख्खं बॉलिवूड हादरून गेलंय. तर हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाल्याचं म्हटलं जातंय. मात्र ज्येष्ठ अभिनेते राजा मुराद यांना वेगळाच संशय आलाय. आधी सलमान खानच्या घरावर गोळीबार, त्यानंतर शाहरुख खानला धमकी, पुढे बाबा सिद्दिकींची हत्या यानंतर आता सैफ अली खानवर थेट घरात घुसून हल्ला करण्यात आलाय.

त्यामुळे हा हल्ला सैफचा जीव घेण्यासाठी असल्याचा संशय बळावलाय. तर या हल्ल्याच्या संशयाची सुई 26 वर्षापुर्वीच्या काळवीट प्रकरणामुळे बिश्नोई गँगच्या दिशेने वळाल्याची चर्चा रंगलीय.. मात्र हे काळवीट प्रकरण काय आहे? पाहूयात.

काय आहे काळवीट प्रकरण?

सप्टेंबर 1998

जोधपूरमध्ये हम साथ साथ है चित्रपटाचं शुटिंग

चित्रपटाच्या शुटिंगसाठी सलमान, सैफ अली खान आणि तब्बूची हजेरी

28 सप्टेंबर 1998

भावाद जवळील कांकणी गावात काळवीटाची शिकार

कलाकार राहत असलेल्या फार्म हाऊसवर काळवीटाचे अवशेष

काळवीटाची शिकार केल्याने बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या

बिश्नोई समाजाकडून सलमानवर एफआयआर

सैफ अली खान आणि तब्बू यात सहआरोपी

2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला संपवण्याचा इशारा दिला. बिश्नोई गँगने सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबारही केला होता. एवढंच नाही तर सलमान खानचे निकटवर्तीय असल्याने बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे 1998 च्या काळवीट हत्या प्रकरणी आरोपी बनवलेल्या सैफ अली खानवर हल्ला झाल्याने या प्रकरणी बिश्नोई गँगचं कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जातेय.. त्यामुळे सैफवर झालेला हल्ला चोरीच्या उद्देशाने होता की अजून दुसऱ्या कुठल्या उद्देश्यानं हे आता तपासातून स्पष्ट होईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT