Saif Ali Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यानंतर तैमूर म्हणाला, "बाबा तू मरणार नाहीस ना? " सैफनं सांगितला 'त्या' रात्रीचा घटनाक्रम

Saif First Reaction On Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याने पहिल्यांदाच 'त्या' रात्री नेमंक काय घडलं, याचा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

अलिकडेच बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) मोठ्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचला आहे. चोरीच्या उद्देशाने घरात आलेल्या चोरासोबत सैफ अली खानचा झटापट झाली. यात सैफवर तब्बल 6 वेळा चाकूने वार करण्यात आले. यात सैफ खूप जखमी झाला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात त्याच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढण्यात आला. आता मात्र सैफ अली खानची तब्येत उत्तम आहे.

नुकत्याच झालेल्या एका मिडिया मुलाखतीत सैफ अली खानने त्यारात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितला आहे. सैफ अली खानने सांगितले की, "करीना बाहेर डिनरला गेली होती. मी घरात झोपलो होतो. थोड्यावेळाने घरात काम करणारी बाई ओरडत आली की, घरात जेहच्या खोलीत एक एक माणूस घुसला आहे. त्याच्याकडे चाकू असून तो पैशांची मागणी करत आहे. तेव्हा जवळपास २ वाजले होते. तेव्हा जेहच्या खोलीत जाताच मी घाबरलो, कारण त्या माणसाच्या हातात दोन स्टिक्स होत्या असे मला वाटले मात्र ते हॅक्सा ब्लेड होते. त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता. "

पुढे सैफ म्हणाला की, "तो जेहच्या बेडवर असल्यामुळे मी कशाची परवा न करता खोलीत शिरलो आणि त्या माणसाला धरले. त्याने माझ्या पाठीवर वार केले. त्या क्षणी मला वेदनांची जाणीव झाली नाही. माझ्या अंगावर जखमा होत होत्या तरी मी त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मग आमच्यात हाणामारी सुरू झाली. माझ्या हातावर वार करून शेवटी तो पळून गेला. "

सैफला झालेल्या वेदनांवर तो म्हणाला, "मी अक्षरशः रक्तबंबाळ अवस्थेत होतो. मला हळूहळू वेदना होत होत्या. पाठीत काहीतरी गडबड असल्याचे वाटत होते." तेव्हा तैमूरने मला विचारले की, "तुम्ही मरणार का? " त्यावर मी उत्तर देत म्हणालो, "नाही" तेव्हा तैमूरला (Taimur Ali Khan) शांत करून मी इब्राहिम आणि तैमूर लीलावती रुग्णालयात रिक्षाने गेलो. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT