Amaran Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amaran : 'सिंघम' अन् 'रूह बाबा'ला साई पल्लवीनं दिली टक्कर; 'अमरन' चित्रपटाने मारली बाजी,थेट 300 कोटींचा गल्ला

Amaran Box Office Collection: साई पल्लवीच्या 'अमरन' चित्रपटाने 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटांना टक्कर दिली आहे. आतापर्यंत किती कमावले जाणून घ्या.

Shreya Maskar

दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. एक 'सिंघम अगेन' आणि दुसरा 'भूल भुलैया 3'. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता आहे. बॉक्स ऑफिसवर अजय देवगण आणि कार्तिक आर्यन एकमेकांना टक्कर देत होते. मात्र आता या दोघांना साई पल्लवी टक्कर देत आहे.

साऊथच्या 'अमरन' (Amaran) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. 'अमरन' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला. 'अमरन' चित्रपटात शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या चित्रपटात शिवकार्तिकेयन आर्मी ऑफिसर मेजर मुकुंद वरदराजनची भूमिका साकारली आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीसची भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 'इंडियाज मोस्ट फियरलेस: ट्रू स्टोरी ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज' या पुस्तकावर 'अमरन' चित्रपट आधारित आहे. अमरन' चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार पेरियासामी यांनी केले आहे.

'अमरन' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन

'अमरन' हा तमिळ चित्रपट कन्नड, हिंदी, मल्याळम भाषांमध्ये देखील प्रदर्शित झाला. मीडिया रिपोर्टनुसार, 'अमरन' चित्रपटाने 25 दिवसांत भारतात 207.70 कोटी रुपये कमावले. तर जगभरात 312.25 कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.

'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत 'सिंघम अगेन'ने 240 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात 392.47 कोटी कमावले आहे. दुसरीकडे 'भूल भुलैया 3' आतापर्यंत 247.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

Vadapav Recipe: घरी वडापाव बनवताना ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा; दुकानात मिळतो तसा टेस्टी लागेल!

SCROLL FOR NEXT