kubbra Sait Saam Tv
मनोरंजन बातम्या

वन नाईट स्टँडनंतर अभिनेत्री प्रेग्नंट, मग घेतला मोठा निर्णय, म्हणाली...

'सेक्रेड गेम्स’ फेमचा धक्कादायक खुलासा

Shivani Tichkule

मुंबई - 'सेक्रेड गेम' या वेबसीरिजमध्ये कोकिळची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कुब्रा सैत आता लेखिकाही बनली आहे. कुब्राने 27 जून रोजी तिचे पहिले पुस्तक ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’ लाँच केले आहे. या पुस्तकात तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या पुस्तकात तिने शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग एवढंच नाही तर तिने तिच्या प्रेग्नन्सीबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.

या पुस्तकाच्या एका चॅप्टरमध्ये कुब्रा सैतने सांगितले की वन नाईट स्टँडनंतर 2013 मध्ये ती गर्भवती झाली होती. त्यानंतर तिला गर्भपात करावा लागला. त्यावेळी कुब्रा 30 वर्षांची होती. तिने सांगितले की, त्यावेळी ती अंदमानच्या सहलीवर होती. मद्यपान केल्यानंतर ती एका मित्रासोबत इंटिमेट झाली. त्यानंतर काही दिवसांनी तिने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे तिला समजले.

कुब्रा सैतने एका मुलाखतीदरम्यान बोलताना आपल्या प्रेग्नेंसीबद्दल कळल्यानंतर काय केले ते सांगितले. ती म्हणाला, जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी एका आठवड्यानंतर गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. मी त्यासाठी तयार नव्हतो. आजही मी आई होण्यासाठी तयार नाही आहे. वयाच्या २३ व्या वर्षी लग्न आणि मग ३० व्या वर्षी आई होणं हे माझ्याकडून होणार नाही. मी त्यावेळी यासाठी तयार नव्हते हे मला माहीत होतं. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि त्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही असे देखील तिने सांगितले.

कुब्रा सैतने सलमान खानच्या रेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची खूपच छोटीशी भूमिका होती. त्यानंतर तिने ‘जवानी जानेमन’, ‘सुल्तान’, ‘सिटी ऑफ लाइफ’ या चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मात्र ओटीटी वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मधूनच मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरमध्ये विद्यार्थ्यांची जीवघेणी पायपीट, शाळा गाठण्यासाठी मृत्यूच्या ट्रॅकवरुन प्रवास

Face Care: फेस हेअरसाठी तुम्हीपण रेजर वापरताय? चेहऱ्यावर रेजर वापरण्यापूर्वी जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

मुंबईची मोकळी मैदानं भाजप ढापायला निघालंय; ठाकरेंचा CM फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

Sugar Process: गोड पदार्थ खायला फार आवडतात? पण, तुम्हाला माहिती आहे का त्यातील साखल कशी तयार होते?

चार राशींवर शनिदेवाची कृपादृष्टी! आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; वाढणार धन, दौलत

SCROLL FOR NEXT