Abhishek Gaonkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Abhishek Gaonkar : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता चढणार बोहल्यावर; नवरीचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा, पाहा PHOTO

Sonalee Gurav Mehendi: अभिनेता अभिषेक गावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच सोनाली म्हणजे अभिषेकच्या होणाऱ्या बायकोचा मेहंदी सोहळा पार पडला आहे.

Shreya Maskar

आता दिवाळीनंतर सध्या सर्वत्र लगीनघाई पाहायला मिळत आहे. कलाकार लग्नबंधनात अडकत आहे. कोणाचे केळवण पार पडत आहे. तर कोणाचा साखरपुडा होत आहे. अशात आता 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेता अभिषेक गावकर (Abhishek Gaonkar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.

Sonaleee

अभिनेता अभिषेक गावकर हा सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर सोनाली गुरवसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सोनालीच्या मेहंदीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सोनालीच्या रील्स सोशल मिडियावर तुफान गाजतात. त्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभिषेक आणि सोनालीचा साखरपुडा पार पडला होता.

आता हे दोघ लवकरच लग्न करणार आहेत. हे दोघ कायमच एकमेकांना पाठिंबा देताना पाहायला मिळतात. आपल्या अभिनयाने यांची प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं आहे. तसेच सोशल मिडियावर देखील यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

Sonaleee

'सारं काही तिच्यासाठी'मध्ये अभिषेक गावकर याने 'श्रीनू' ची भूमिका साकारली होती. फेब्रुवारी महिन्यात या मालिकेने निरोप घेतला. आता त्यांचे मेहंदी सोहळ्याचे फोटो पाहून प्रेक्षक लग्नासाठी आतुर आहेत.

मेहंदीसाठी सोनालीने (Sonalee Gurav Mehendi) पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तर फुलांचे दागिन्यांनी अधिकच खुलून आला होता. तिच्या हातावर अभिषेकच्या नावाची मेहंदी लागली. तर अभिषेकने मोरपिशी रंगाचा सदरा परिधान केला होता. सध्या चाहते यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तसेच खूप शुभेच्छाही देत आहेत. या दोघांचाही मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT