S. S. Rajamouli
S. S. Rajamouli  Instagram @rrrmovie
मनोरंजन बातम्या

RRR Movie: 'आरआरआर' बॉलिवूड चित्रपट नाही, एसएस राजामौली यांचे धक्कादायक विधान

Pooja Dange

S. S. Rajamouli Spoke About RRR Movie: दाक्षिणात्य चित्रपट 'आरआरआर'ची तुफान चर्चा आहे. या चित्रपटाला ८० व गोल्डन ग्लोब्स अवॉर्ड देखील मिळाला आहे. हा चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत आहे. दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा आहे. काही लोक या गाण्याला खूप साधारण असल्याचे म्हणत आहेत. त्यांच्या मते याला एवढा मोठा सन्मान मिळायला नको होता. दरम्यान, आता राजामौली यांनी यावर मौन सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्याचा 'आरआरआर' हा बॉलिवूड चित्रपट नाही.

दिग्दर्शक राजामौली 'गिल्ड ऑफ अमेरिका'सोबत नुकत्याच झालेल्या त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान बोलत होते. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'आरआरआर' चित्रपटामध्ये एका निर्भय योद्ध्याची कथा सांगितली आहे. जो स्वातंत्र्यपूर्व भारतातील एका महाकाव्यात ब्रिटीश सैन्याची सेवा करणार्‍या एका पौलादी पोलिसाच्या समोर येतो.

राजामौली म्हणाले, 'आरआरआर हा बॉलिवूड चित्रपट नाही, हा दक्षिण भारतातील एक तेलुगू चित्रपट आहे जिथून मी आलो आहे. पण चित्रपट थांबवण्यापेक्षा कथा पुढे नेण्यासाठी मी गाण्यांद्वारे तुम्हाला संगीत आणि नृत्याचा काही भाग देण्यापेक्षा कथेला पुढे नेण्यासाठी मी त्या गोष्टी करतो. चित्रपटाच्या शेवटी तुम्ही म्हणाल की मला तीन तास कसे गेले कळलं नाही, तेव्हा मी म्हणणे 'मी एक यशस्वी चित्रपट निर्माताआहे.'

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटामधील 'नाटू-नाटू' या हिट गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोबमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा (मोशन पिक्चर) पुरस्कार जिंकला. आरआरआर स्टार्स राम चरण आणि ज्युनियर NTR यांच्या नृत्याचा आणि मैत्रीच्या भावनेचा उत्सव साजरा करणाऱ्या या गाण्याने टायलर स्विफ्ट, रिहाना आणि लेडी गागा यांच्यापासून गोल्डन ग्लोबमध्ये जिंकण्यासाठी सर्वांना पराभूत केले आहे.

95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी 'नाटू-नाटू' गाण्यासाठी देखील निवडले गेले आहे. राम चरणने म्हटले आहे की, जर चित्रपटाने ऑस्कर जिंकला तर तो आणि ज्युनियर एनटीआर कदाचित स्टेजवर देखील नृत्य करतील. तेलुगू ट्रॅक नाटू-नाटू हे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम किरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे आणि काल भैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी गायले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

Live Breaking News : सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार १२ मेला कल्याणमध्ये

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

LokSabha Election: सांगोल्यात EVM जाळलं; एकजण पोलिसांच्या ताब्यात

Kushal Badrike : “सहप्रवासी बदलत राहतात, “प्रवास” मात्र कायम असतो...”; कुशल बद्रिके आयुष्याबद्दल खूप काही बोलून गेला, पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT