Rohit Shetty Firing Case Saam tv
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; राजस्थान, हरियाणा आणि यूपीमधून सहा आरोपींना अटक

Rohit Shetty Firing Case: मुंबई क्राईम ब्रांचने प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी सहा आरोपींना अटक केली आहे. राजस्थान, हरियाणा आणि यूपीमधून या सहा आरोपींना अटक केली आहे.

Shruti Vilas Kadam

Rohit Shetty Firing Case: मुंबई क्राईम ब्रांचने प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई करत आणखी सहा आरोपींना अटक केली आहे. राजस्थानमधील बहादूरगड येथून ही कारवाई करण्यात आली असून, मुंबई क्राईम ब्रांच आणि बहादूरगड स्पेशल टास्क फोर्स यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.

या कारवाईत हरियाणामधून चार तर उत्तर प्रदेशमधून दोन असे एकूण सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोबाईल फोनसह गुन्ह्याशी संबंधित काही महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान या आरोपींचा गोळीबाराच्या कटात नेमका सहभाग काय होता, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या सहाही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडीत आरोपींची कसून चौकशी करून या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या प्रकरणात यापूर्वी पुण्यातून पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. त्या आरोपींनाही न्यायालयाने १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील आरोपींपर्यंत पोलिसांना पोहोचता आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या सर्व कारवायांमुळे आतापर्यंत या गोळीबार प्रकरणात एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यामागील नेमका हेतू काय? कोणत्या टोळीचा सहभाग आहे? तसेच या कटामागे कोण मास्टरमाइंड आहे? याचा शोध मुंबई क्राईम ब्रांचकडून सुरू आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांची पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी'नंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या चित्रपटाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT