Riya Kumari Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riya Kumari: अभिनेत्रीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, पतीने सांगितला घटनेचा थरार

अभिनेत्री टुनिशा शर्माच्या आत्महत्येनं सर्वत्र खळबळ उडाली असतानाच आणखी एका अभिनेत्रीच्या हत्येने सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

Chetan Bodke

Riya Kumari: अभिनेत्री टुनिशा शर्माच्या आत्महत्येनं सर्वत्र खळबळ उडाली असतानाच आणखी एका अभिनेत्रीच्या हत्येने सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. झारखंडमधील लोकप्रिय अभिनेत्री रिया कुमारी उर्फ ईशा आलियाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रियाची गोळी झाडून हत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

ही अभिनेत्री मुळची झारखंडची असून तिची बंगालमध्ये हत्या करण्यात आली आहे. या २२ वर्षीय अभिनेत्रीची काल सकाळी पश्चिम बंगालमधील हावडामध्ये हत्या करण्यात आली आहे.

रांची- कोलकाता मार्गावर बुधवारी सकाळी अभिनेत्री रिया कुमारीची गोळ्या झाडत हत्या करण्यात आली. रियाचा पती प्रकाश कुमारने सध्या दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरील दरोडेखोरांनी तिची हत्या केली आहे. पण सध्या तरी पोलिस या घटनेकडे संशयास्पदच पाहत आहेत. काल सकाळी रिया, तिचा पती आणि तीन वर्षांच्या मुलीसह ते कोलकात्याला जात होते. रियाच्या पतीची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. रियाची झारखंडमध्ये ईशा आलिया या नावाने ओळख आहे.

खोरठा आणि प्रादेशिक भाषेतील अल्बम्समध्ये रियाने काम केले आहे. रियाचा पती प्रकाशही प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि अल्बम तयार करतो. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या पती आणि मुलांसह कारमधून कोलकाताला निघाला होता. महिषरेखा पुलाजवळ त्यांनी कार थांबवली, त्यावेळी त्याच्या गाडीजवळ तीन दरोडेखोर हत्यारांसह पोहोचले. त्यांनी त्यांची लूटमार करण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही त्यांना विरोध केला, त्या काही दरोडेखोरांपैकी एकाने रियावर गोळी झाडली.

गोळी झाडताच दरोडेखोरांनी तिथुन पळ काढला. ती खाली पडताच तिच्या पतीने आरडा- ओरडा केला. स्थानिकांकडेही मदत मागितली, तेथील काही लोकांनी लगेचच झालेल्या घटनेबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. रियाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण शस्रक्रिये दरम्यानच तिचे निधन झाले. हत्येनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह, तेथील स्थानिक नागरिकांची चौकशी सुरु केली आहे. सध्या तरी त्यांची कार फॉरेंसिक तपासासाठी जप्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टमध्येच बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली, KISS करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Motyacha Bangdya Designs : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT