Riteish Deshmukh Movie Promotion Saam Tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh: रितेशचं वेडNess, चाहत्यांच्या गराड्यात घेतला ढोल वाजविण्याचा आनंद

'वेड' चित्रपट ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pooja Dange

Ved Movie: रितेश देशमुख त्याच्या विनोदी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. रितेश आणि जेनेलिया नेहमीच त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. रितेशने नुकताच त्याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश ढोल वाजवताना दिसत आहे.

रितेश देशमुखने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुफान गर्दीत ढोल वाजवताना दिसत आहे. एका ढोल पथकासोबत रितेश ढोल वाजवत आहे. रितेश खूप उत्साहात ढोल वाजवत आहे. तसेच त्याच्या या वादनाला गर्दीतून प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. गर्दीतील ही तरुण मंडळी या वेळी एका सुरात ओरडून त्याला समर्थन देत आहेत.

या व्हिडिओमध्ये रितेशने लाल रंगाचे टी-शर्ट घातले आहे. तसेच त्या टी-शर्टवर 'वेड' असे लिहिले आहे. यावरून हे लक्षात येईल ही रितेश या ठिकाणी त्याच्या 'वेड' चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी गेला आहे. रितेशने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, हा वेडेपणा आहे... पुण्यातील कॉलेज विद्यार्थंसोबत ढोल वाजविण्याचा अप्रतिम अनुभव. (Riteish Deshmukh)

पुण्यातील वेड चित्रपटाच्या प्रमोशन वेळी रितेशसह जेनेलिया सुद्धा उपस्थित होती. रितेश या जेनेलिया आणि कॉलेज विदयार्थांसोबतचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. जेनेलिया सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहे. जेनेलियाने सुद्धा या कार्यक्रमादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. (Social Media)

रितेश सध्या त्याच्या 'वेड' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'वेड' या चित्रपटामध्ये रितेश मुख्य भूमिका साकारणार आहेच. परंतु त्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. 'वेड' चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलिया बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत. 'वेड' चित्रपट ३० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT