Riteish Deshmukh  saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish Deshmukh : मनोरंजनाचा डबल धमाका! थिएटरमध्ये 'धुरंधर 2' पाहताना मिळेल भन्नाट सरप्राइज

Riteish Deshmukh- Raja Shivaji Movie Teaser : रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचा टीझर थेट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Shreya Maskar

थिएटरमध्ये 'धुरंधर 2' पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळणार आहे.

रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' ची झलक थिएटरमध्ये दिसणार आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा जगाला सांगितली जाणार आहे.

सध्या थिएटरमध्ये 'धुरंधर 2' धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र थिएटरमध्ये 'धुरंधर 2' पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊंनी चाहत्यांना एका खास अंदाजात सरप्राइज दिले आहे. अखेर बहुप्रतीक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' चा टीझर प्रेक्षकांसमोर येणार आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर 'धुरंधर-द रिव्हेंज' या चित्रपटाबरोबर थिएटरमध्ये दाखवण्यात येणार आहे.

आता 'धुरंधर 2' पाहणे म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका होय. 18 मार्चपासून सुरू झालेल्या पेड प्रिव्ह्यूमध्ये प्रेक्षकांना भव्य इतिहासाची झलक पाहायला मिळेल. या संबंधित एक खास पोस्ट रितेश देशमुखने सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा जगाला सांगितली जाणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख झळकणार आहे.

रितेश देशमुखने पोस्टमध्ये लिहिलं की, "पहिलं नमन माझ्या राजाला! आपला राजा... आपला अभिमान... 'राजा शिवाजी' ची पहिली झलक 'धुरंधर 2' चित्रपटातून आपल्या भेटीला घेऊन येत आहेत आपल्या राजाची गाथा - कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व रूपात!!!" रितेश देशमुखच्या या पोस्टवर चाहते कौतुकाचा, शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. प्रेक्षक 'राजा शिवाजी' चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट 1 मे 2026ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सहा भाषांमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे चाहते खूपच खुश आहेत.'राजा शिवाजी' या चित्रपटात रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT