Riteish - Raja Shivaji Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सुपरहिट! मराठीसोबत हिंदी सिनेमांनाही टाकले मागे, वाचा छप्परफाड कमाई

Raja Shivaji Box Office Collection Day 26 : 'राजा शिवाजी' चित्रपट रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. महाराष्ट्रात या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले. चित्रपटाची २६ दिवसांची कमाई, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' रितेश देशमुखचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.

'राजा शिवाजी' ने मराठी चित्रपट विश्वात इतिहास रचला.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत. गेल्या एक महिन्यापासून थिएटरमध्ये फक्त 'राजा शिवाजी' ची गर्जना ऐकू येत आहे. रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' जगभरात धुमाकूळ घातला. हा चित्रपट १ मे ला रिलीज झाला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता रितेश देशमुखने साकारली. तसेच चित्रपटात महेश मांजरेकर, जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन , सलमान खान असे अनेक कलाकार झळकले आहे. २६ दिवसांत चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २६

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने २६ व्या दिवशी 834 शोजमधून ग्रॉस कलेक्शन 51 लाख रुपये झाले, तर नेट कलेक्शन 45 लाख रुपये झाले आहे. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाने जगभरात ₹१२५.१८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर भारतील बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी' ने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

'राजा शिवाजी' ठरला रितेश देशमुखच्या करिअरमधील ब्लॉकबस्टर चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला 'राजा शिवाजी' हा सिनेमा रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरला. या चित्रपटाने रितेशला खूप लोकप्रियता मिळवून दिली. मराठीसोबत अनेक हिंदी चित्रपटांना देखील 'राजा शिवाजी' ने मागे टाकले आहे. मराठीत सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी दोन्ही कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

ओटीटी अपडेट

राजा 'शिवाजी' चित्रपटाला रिलीज होऊन आता एक महिना होत येणार आहे, त्यामुळे सोशल मीडियावर 'राजा शिवाजी' च्या ओटीटी राइट्सची चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लेटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचे बोले जात आहे. जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळू शकतो असे बोले जात आहे. मात्र अद्याप ओटीटी प्लेटफॉर्म आणि ओटीटी रिलीज डेट याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

Diabetes-High BP : मधुमेह अन् बीपी कंट्रोल करतील 'हे' ५ सुपरफूड, वजनही होईल झटपट कमी

NEET Paper Update : NEET पेपरफुटी प्रकरणातील मोठी अपडेट! २ शिक्षकांना अटक, आरोपी प्रोफेसरचा नंबर 'गॉड' नावाने सेव्ह

किडनीतील घाण बाहेर काढतील 'या' ५ भाज्या; रोज खाल्ल्यास मूत्रपिंड राहील एकदम स्वच्छ!

Gold Price Today: सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा इतक्या रूपयांवर, जाणून घ्या २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT