Riteish - Raja Shivaji Collection  saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर सुसाट; १५ व्या दिवशीही केली 'इतक्या' कोटींची बक्कळ कमाई, रचणार 'हा' मोठा इतिहास

Raja Shivaji Box Office Collection Day 15 : 'राजा शिवाजी' चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. रितेश भाऊंच्या चित्रपटाने १५ व्या दिवशी बक्कळ कमाई केली. कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे.

'राजा शिवाजी' चित्रपटाने मराठी आवृत्तीत बक्कळ कमाई केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारा रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज होऊन दोन आठवडा झाला आहे. चित्रपटाने दोन आठवड्यात बक्कळ कमाई केली आहे. 'राजा शिवाजी' १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत रितेश भाऊ झळकले. 'राजा शिवाजी' हा एक ऐतिहासिक ड्रामा आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. १५ व्या दिवशी किती कोटी कमावले , जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १५

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी'ने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात या ऐतिहासिक चित्रपटाने ५२.६५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतरच्या आठवड्यात चित्रपटाच्या एकूण कमाईमध्ये आणखी २४.३० कोटी रुपयांची भर पडली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १५ व्या दिवशी या चित्रपटाने २,१४२ शोजमधून १.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मागील दिवसाच्या १.९० कोटी रुपयांच्या कमाईच्या तुलनेत यात २३.७% ची घट दिसून आली.यामुळे चित्रपटाची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ९२.८१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, तर भारतातील एकूण नेट कमाई ७८.४० कोटी रुपयांवर गेली आहे.

'राजा शिवाजी' भारतातील दिवसानुसार नेट कमाई

  • दिवस १ (हिंदी): ३.३५ कोटी रु.; (मराठी): ८ कोटी रु.

  • दिवस २ (हिंदी): ३.४० कोटी रु.; (मराठी): ७.१५ कोटी रु.

  • दिवस ३ (हिंदी): ४.२५ कोटी रु.; (मराठी): ७.७५ कोटी रु.

  • दिवस ४ (हिंदी): १.३५ कोटी रु.; (मराठी): ४.२५ कोटी रु.

  • दिवस ५ (हिंदी): १.५५ कोटी रु.; (मराठी): ३.३५ कोटी रु.

  • दिवस ६ (हिंदी): १.२५ कोटी रु.; (मराठी): ३ कोटी रु.

  • दिवस ७ (हिंदी): १.२५ कोटी रु.; (मराठी): २.७५ कोटी रु.

  • दिवस ८ (हिंदी): ०.७० कोटी रु.; (मराठी): २.५० कोटी रुपये

  • दिवस ९ (हिंदी): १.३२ कोटी रुपये; (मराठी): ४.२५ कोटी रुपये

  • दिवस १० (हिंदी): १.८० कोटी रुपये; (मराठी): ५ कोटी रुपये

  • दिवस ११ (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.९० कोटी रुपये

  • दिवस १२ (हिंदी): ०.६५ कोटी रुपये; (मराठी): १.८५ कोटी रुपये

  • दिवस १३ (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.४० कोटी रुपये

  • दिवस १४ (हिंदी): ०.५० कोटी रुपये; (मराठी): १.४० कोटी रुपये

  • दिवस १५ (हिंदी): ०.२० कोटी रुपये; (मराठी): १.२५ कोटी रुपये

  • एकूण: ७८.४० कोटी रुपये

'राजा शिवाजी' रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'राजा शिवाजी'ने प्रदर्शनाच्या १५ दिवसांत ७८.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'बाई पण भारी देवा'च्या ७६.२८ कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकत, हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. आता तो 'सैराट'चा ८०.९८ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्यापासून फक्त २ कोटी रुपये दूर आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला

Ladki Bahin Yojana: मार्चचे ₹१५०० जमा; लाडक्या बहिणींना एप्रिल-मे महिन्याचे ₹३००० कधी येणार?

Saturday Horoscope: जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते; वाचा आजचं राशीभविष्य

21 जूनला पुन्हा NEET ची परीक्षा, पुढील वर्षापासून ऑनलाईन होणार पेपर

Success Story: डोबिंवलीतील १४ वर्षांच्या लेकाने नाव गाजवलं! खुल्या समुद्रात पोहण्याचा केला विक्रम, ४ तासात केलं २३ किमी अंतर पार

SCROLL FOR NEXT