Riteish - Raja Shivaji Collection  saam tv
मनोरंजन बातम्या

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चं जगभरात तुफान; रितेश भाऊ महिन्याभरात मालामाल, चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाचून व्हाल चकित

Raja Shivaji Box Office Collection Day 30 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज होऊन आता एक महिना पूर्ण झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट रिलीज होऊन १ महिना झाला.

'राजा शिवाजी' १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी'मधून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे.

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक चित्रपट १ मे ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाने महिन्याभरात बक्कळ कमाई केली आहे. जगभरात 'राजा शिवाजी'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले असून या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपट जवळपास ७५-१०० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाचा सध्या पाचवा आठवडा सुरू आहे. चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३०

'राजा शिवाजी' चित्रपटाने जगभरात ₹११४ ते ₹१२१ कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात ₹111.70 कोटींचे ग्रॉस कलेक्शन तर ओव्हरसीज मार्केटमध्ये ₹4.27 कोटींची कमाई चित्रपटाने केली आहे. चित्रपटाचे नेट कलेक्शन ₹94.56 कोटींवर पोहोचले आहे. 'राजा शिवाजी'ने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 24.30 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 12 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 4.80 कोटी रुपये कमावले आहेत. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने २९ व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 32 लाख आणि ३० व्या दिवशी म्हणजे शनिवारी 58 लाख रुपयांची कमाई केली आहे.

'राजा शिवाजी' का सुपरहिट झाला?

  • रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' या चित्रपटावर तब्बल १० वर्ष काम केले आहे. त्याने दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता अशा दुहेरी भूमिका निभावल्या आहेत.

  • 'राजा शिवाजी' चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळी पाहायला मिळत आहेत. जिनिलीया देशमुख सईबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेत झळकताना दिसेल. संजय दत्तने अफझल खानची भूमिका साकारली.

  • 'राजा शिवाजी' चित्रपटात बॉलिवूडचा भाईजान सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सलमानने 'जीवा महाला' यांची भूमिका साकारली आहे. "शिवाजी नाही, शिवाजी राजे म्हणायचं!" हा सलमान भाईचा डायलॉग खूप गाजत आहे.

  • 'राजा शिवाजी' चित्रपटातील गाण्यांना अजय-अतुल यांनी संगीत दिले. संगीतकार अजय-अतुल यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने चित्रपटातील भावनिक आणि ॲक्शन दृश्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

  • 'राजा शिवाजी'मध्ये दाखवलेली ॲक्शन आणि युद्धाची दृश्ये खूप खरी वाटतात. हाताने, तलवारीने लढली जाणारी लढाई पाहून आपल्याला शिवरायांचा नक्कीच आठवतो.

प्रेक्षक आता 'राजा शिवाजी' चित्रपट ओटीटीवर आणि टिव्हीवर कधी येणार, याची वाट पाहत आहे. लहान मुलांसोबत आवर्जून पाहावा असा 'राजा शिवाजी' चित्रपट आहे. चित्रपट रविवारी किती कमावतो याकडे, प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT