Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : भाऊ is Back! रितेश देशमुख ग्रँड फिनाले गाजवायला सज्ज

Riteish Deshmukh : 'बिग बॉस मराठी'चे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. एवढे दिवस प्रेक्षक 'भाऊच्या धक्क्याला मिस करत होते. मात्र आता पुन्हा एकदा रितेश देशमुख ग्रँड फिनाले गाजवायला आला आहे.

Shreya Maskar

हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस मराठी'मुळे चांगलाच चर्चेत आहेत.'बिग बॉस मराठी 5'च्या होस्टिंगची धुरा महाराष्ट्राचा लाडका रितेश भाऊ सांभाळत आहेत.

सदस्यांना पाठिशी घातल्याने, कधीकाळी त्यांच कौतुक केल्याने तर कधी चांगले शाळा घेतल्यामुळे 'भाऊचा धक्का'कायम चर्चेत राहीला. नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस मराठी' होय. मात्र गेले दोन आठवडे रितेश भाऊ चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त परदेशी वारी करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा 'भाऊचा धक्का' खूप मिस करत आहेत. पण आता पुन्हा रितेश देशमुख (Riteish Deshmukh) 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi ) मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रितेश भाऊंच्या शेवटच्या 'भाऊच्या धक्क्याची' संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे.

'भाऊच्या धक्क्यावर' गेले दोन आठवडे रितेश भाऊंची कमतरता जाणवली. त्यांची सदस्यांची शाळा घेण्याची हटके शैली आणि कल्ला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेला धुमाकूळ घालण्यासाठी रितेश भाऊ सज्ज आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा मंच सुपरस्टार रितेश देशमुख गाजवला. रितेश भाऊंनी आपल्या खास स्टाइलने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि दमदार होस्टिंग केली. आता ग्रँड फिनालेला कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT