थाटात पार पडला ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांचा साखरपुडा; पहा Photos Instagram/@hruta12
मनोरंजन बातम्या

थाटात पार पडला ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांचा साखरपुडा; पहा Photos

मराठी मालिकेतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी मालिकेतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. (hruta durgule photo) ऋताने तिचा बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याशी शुक्रवारी, (ता. 24) डिसेंबर रोजी साखरपुडा झाला. केशरी- गुलाबी रंगाची साडी ऋताने परिधान केली होती. तर प्रतिकने ऑफ व्हाईट रंगाचा शेरवानी सूट घातला होता.

साखरपुड्यात एकमेकांना अंगठी घालताना ऋताने सुंदर गाऊन परिधान केला होता. तर प्रतिकने सूट घातला होता. या दोघांचा तो लूक पाहून त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत तसेच या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. ऋता आणि प्रतिक यांच्या साखरपुड्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपूर्वीच ऋताने आपल्या इंस्टाग्रामवर काऊंटडाऊन (Countdown) करणाऱ्या पोस्ट शेअर करायला सुरुवात केली. त्या पोस्ट वरून त्यावरून ती लग्न किंवा साखरपुडा करणार आहे असा अंदाज वर्तवला जात होता. यासंदर्भात स्वतः ऋताने वृत्तसंस्थेला सांगितले की, ' अखेर माझ्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला प्रारंभ होत आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहेत त्यामुळे मी खूपच उत्साहित असले तरी थोडीशी नव्हर्स देखील आहे. आमचे हे लग्न अरेंज मॅरेजच आहे. प्रतिकने मला यावर्षी ऑगस्टमध्ये प्रपोज केले होते आणि याबाबत मी आई-बाबांशी बोलले. त्यानंतर आमचे लग्न जुळावे, यासाठी आमच्या दोघांच्याही आईवडिलांनी पुढाकार घेतला.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा १ लाखांच्या पार; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

Nashik : सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; तिघांविरोधात गुन्हा दाखल, नातेवाईकांनी सासरच्या अंगणात केला अंत्यविधी

Maharashtra Politics : ४ मंत्री, शिवसेनेचे ४ खासदार हनी ट्रॅपमध्ये, गिरीश महाजनांचा फोटो टाकत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT