Rinku Rajguru Instagram @iamrinkurajguru
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru At Kedarnath: हर हर महादेव! डोक्याला भस्म, गळ्यात भगवी शाल; केदारनाथच्या चरणी रिंकू राजगुरू लीन

Rinku Rajguru Social Media: रिंकूने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत.

Pooja Dange

Rinku Rajguru Seeks Blessing Of Kedarnath:

'सैराट' या चित्रपटातून आपल्या रिंकू राजगुरूने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर रिंकू अभिनय क्षेत्रात अधिक यश मिळवले. मराठीसह रिंकूने हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचे नाव कमावले आहे.

रिंकू सध्या चित्रपटामध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना भेटत असते. नवनवीन फोटो पोस्ट करून रिंकू चाहत्यांची पसंती मिळवत असते. रिंकूने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु रिंकू इंस्टाग्रामवर परतली आहे आणि चाहत्यांसोबत तिचे अपडेट शेअर करत आहेत.

रिंकूने काल एक पोस्ट केली होती. या फोटोमध्ये रिंकू तिचा पहिला ट्रेक करत असल्याचे सांगितले होते. या फोटोमध्ये डोंगरात फिरत असल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या मागे एक पांढरीशुभ्र नदी वाहत आहे. नेमकी रिंकू कुठे गेली आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रिंकूने केलेला हा ट्रेक केदारनाथसाठी होता. रिंकू केदारनाथला गेली आहे. केदारनाथ मंदिराबाहेर रिंकूने फोटो काढले आहेत. या फोटोंमध्ये रिंकूने डोक्याला भस्म लावलेले दिसत आहे. तर अंगावर शाल घेतलीआहे. रिंकूने हे फोटो पोस्ट करत 'हर हर महादेव' असे कॅप्शन दिले आहे. (Latest Entertainment News)

अभिनेत्री सायली संजीवसह अनेक नेटकऱ्यांनी रिंकूच्या या पोस्टवर 'हर हर महादेव' अशा कमेंट केल्या आहेत. रिंकू राजगुरूने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर देखील केदारनाथचे फोटो शेअर केले आहेत. रिंकू देववेडी हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तिने मागे सहकुटूंब ज्योतिबाचे देखील दर्शन घेतले होते.

अनेक सेलिब्रिटी सध्या केदारनाथच्या दर्शनाला जाताना दिसत आहे. सारा अली खान, अक्षय कुमार, कंगना रनौत, विदुला चौघुले, शाहरुख खान या सेलिब्रिटींनी केदारनाथचे दर्शन घेतेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT