Rinku Rajguru On Krishnaraaj Mahadik Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rinku Rajguru: जेव्हा मी लग्न करेन...; कृष्णराज महाडिक यांच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोवर रिंकू राजगुरुने केला मोठा खुलासा

Rinku Rajguru On Krishnaraaj Mahadik: रिंकू राजगुरुने सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांच्यासोबत झालेल्या भेटचं आणि त्या व्हायरल झालेल्या फोटोमागील गुपित सांगितलं आहे.

Shruti Vilas Kadam

Rinku Rajguru On Krishnaraaj Mahadik: अभिनेत्री रिंकू राजगुरु हीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केल आहे. आता लवकरच रिंकूचा 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सकाळ प्रीमियरला दिलेल्या मुलाखतीत रिंकूने कोल्हापूरचे भाजप नेते धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांच्यासोबत झालेल्या भेटचं आणि त्या व्हायरल झालेल्या फोटोमागील गुपित सांगितलं आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरुने या मुलाखतील दिलखुलास गप्पा मारत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी तिला कृष्णराज महाडिक यांच्यासोबत झालेल्या भेटचं आणि त्या व्हायरल झालेल्या फोटोमागे नक्की कारण काय असं विचारलं त्यावर रिंकू म्हणाली, तो फोटो मी नव्हताच पोस्ट केला. खरंतर पण मलाही नव्हतं माहित असं काही होईल आपण रॅडम कुठेही जातो आणि आपल्यासोबत लोक फोटोज काढतात तसंच त्या दिवशी देखील घडलं. अभिनेत्री असल्यामुळे फोटो काढणे ही सामान्य गोष्ट आहे.

रिंकू पुढे म्हणाली, त्यांच्या टीमने तो फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर मलाही असं वाटलं एका फोटोबद्दल एवढी चर्चा नको व्हायला हवी होती. मी जेव्हा लग्न करेन तेव्हा मीच सांगेन सगळ्यांना की मी लग्न करते. या गोष्टी माझ्यासोबत आधी देखील घडल्या आहेत त्यामुळे मी या गोष्टीचा एवढा ताण नाही घेत.

रिंकूच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' या चित्रपटात तिच्यासह सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव असणार असून येत्या २२ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Lonari: 'गं तुझं टपोर डोळं...', गोड गोजिऱ्या तेजस्विनीचा मनमोहक लूक

Maharashtra Live News Update: नागपूरच्या कोराडी जगदंबा महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

Bhayandar Accident: ओव्हरटेक करताना घात झाला, भीषण अपघातात डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू

Party Wear Sarees: सण, लग्न किंवा समारंभासाठी एकदा नक्की ट्राय करा पार्टी वेअर सिक्वेन्स साडी, मिळेल ग्लॅमरस लूक

Maharashtra Politics: कर्जतमध्ये अजितदादांचा डाव; भाजप, शिवसेनेला मोठा धक्का; दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

SCROLL FOR NEXT