Ali Fazal-Richa Chadha Movie Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Richa Chadha Ali Fazal: रिचा आणि अली फजलचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

रिचा आणि अली फजल यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Richa-Ali Upcoming Movie: रिचा चड्ढा आणि अली फजल नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा सोशल मीडियावर होत होती. लग्नानंतर हे जोडपे आता कामाला लागले आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. 'गर्ल्स विल बी गर्ल्स' हा त्यांचा पहिला चित्रपट असून याचे शूटिंग उत्तराखंड येथे सुरू झाले आहे.

'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटातून मल्याळम अभिनेत्री कनी कुसरुती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शुचि तलाती या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. गेल्यावर्षी या चित्रपटाला मिळालेल्या अनेक अनुदानांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या शहरातील बोर्डिंग शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय मीराची कथा आहे. हा चित्रपट आई आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित आहे.

रिचा आणि अली फजल यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव 'पुशिंग बटन्स स्टुडिओ' असे आहे. या प्रोडक्शन हाऊसने जून २०२२मध्ये ‘अंडरकरंट’ नावाचे एक वर्कशॉप आयोजित केला होते. हे वर्कशॉप फिल्म इंडस्ट्रीमध्ये गॅफर बनू इच्छिणाऱ्या महिलांसाठी होता. (Richa-Ali)

मल्याळम अभिनेत्री कनी कुसरुती या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. कनी कुसरुतीला केरळ राज्य पुरस्कार, फिल्मफेयर पुरस्कार, रोम प्रिज्मा पुरस्कार आणि ब्रिक्स आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. इंडिपेन्डन्ट सिनेमामध्ये सुद्धा ती बरीच प्रसिद्ध आहे. प्रीती पाणिग्रही आणि केशव बिनॉय किरण हे दोन नवीन कलाकार या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. (Actress)

चित्रपटाची दिग्दर्शिका शुचि तलातीने चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणाली की, “मी स्वाभाविकपणे या प्रक्रियेने भारावून गेलो आहे आणि माझा पहिला चित्रपट करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला स्क्रिप्टवर विश्वास आहे कारण मला मिळालेल्या अनेक अनुदानांमुळे आमच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. मला वाटते की मी अपेक्षा पूर्ण करू शकतो. मी अप्रतिम कलाकार आणि एका उत्तम क्रू सोबत काम करत आहे, त्यामुळे मी कृतज्ञ आहे."

अभिनेत्री आणि निर्माती रिचा चढ्ढाने सुद्धा या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली आहे की, “मी या विनम्र सुरुवातीबद्दल आभारी आहे. कारण मला नेहमीच चांगल्या दर्जाचे इंडी चित्रपट बघायला आवडतात. शुचि आणि मी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी आहोत. मी या प्रवासाचा एक भाग बनून आनंदी आहे. मला खात्री आहे की ती एक चांगला चित्रपट बनवेल." (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT