का रे दुरावा! 'या' व्यक्तीमुळे सामंथाने नागा चैत्यनपासून घेतला काडीमोड? Saam Tv
मनोरंजन बातम्या

का रे दुरावा! 'या' व्यक्तीमुळे सामंथाने नागा चैत्यनपासून घेतला काडीमोड?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री समंथा रूथ प्रभू Samantha Akkineni आणि नागा चैतन्य या दोघांनी नुकतीच वेगळं होत असल्याची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर चाहत्यांच्या निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या. या दोघांच्या घटस्फोटाचा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही परंतु, सध्या सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

हे देखील पहा -

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात एका तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये तिसऱ्याचं व्यक्तीची एण्ट्री झाली आहे. सामंथा आणि तिचा डिझायनर मित्र प्रीतम जुकलकर यांच्या वाढत्या मैत्रीमुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सामंथा आणि प्रीतम यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यातील वाद वाढू लागले होते. या जोडप्यामधील वाद इतके विकोपाला गेले की अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी मनम, ये माया चेसावे आणि ऑटोनगर सूर्या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लग्न केले. या जोडप्याने दोन विधींनुसार लग्न केले होते, एक दक्षिण भारताच्या विधीनुसार आणि एक ख्रिश्चन धर्मातील विधीनुसार. त्यांनी माजिली या चित्रपटात सोबत काम केले आहे. समंथा रूथ प्रभू पुढे कठुवाकुला रेंदू काळध आणि शकुंतलम मध्ये दिसणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT