Gashmeer Mahajani Interview Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gashmeer Mahajani Interview: गश्मीरने मुलाखतीतून सांगितली नाण्याची तिसरी बाजू; वडीलांच्या स्वभावाच्या माहित नसलेल्या गोष्टी उलगडल्या

Gashmeer Mahajani News: पॉडकास्ट मुलाखतीत ज्या गोष्टी आजवर फक्त गश्मीरला ठाऊक होत्या, त्याविषयीचा गश्मीरने मुलाखतीतून खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Gashmeer Mahajani Interview

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या आकस्मित निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ उडाली आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन १५ जुलै रोजी झालं असून दोन दिवसानंतर निधनाचे वृत्त माध्यमामध्ये प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावर त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अभिनेत्याने पहिल्यांदाच याविषयावर थेट भाष्य केलं आहे. नुकतंच अभिनेत्याने एका युट्यूब चॅनलला वडीलांच्या निधनानंतर मुलाखत दिली आहे.

नुकताच अभिनेता गश्मीर महाजनीने  ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. यावेळी त्याने पॉडकास्ट मुलाखतीत ज्या गोष्टी आजवर फक्त गश्मीरला ठाऊक होत्या, त्याने त्याविषयीचा खुलासा केला आहे. त्याने मुलाखतीत सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून वडील फॅमिलीपासून वेगळे राहत होते. त्यांनी मला, माझ्या आईला आणि माझ्या बायकोला सुद्धा ब्लॉक केलं होतं. ज्यावेळी मला मुलगा झाला त्यावेळी वडील आमच्यासोबतच राहत होते. ज्यावेळी माझा मुलगा मोठा होत होता, तेव्हा माझ्या मनात त्याला आजोबांचा सहवास मिळावा, अशी भावना होती. जरी त्यांनी फॅमिलीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यांनी आपल्या नातवासोबत वेळ घालवावा.”

मुलाखतीत गश्मीर पुढे म्हणाला, “वडील आमच्यापासून दुर राहत असल्यामुळे मी त्यांना नेहमीच व्हॉट्सॲपला मुलाचे फोटो आणि व्हिडीओ पाठवायचो. मी त्यांना तीन- चार वेळा व्हिडीओ पाठवले होते. त्यातून एक दोन वेळा व्हिडीओ पाहिले आणि नंतर त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं. मी तुम्हाला त्यांचीही बाजु सांगतो, त्यांनी माझा फोन ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे, त्यांचं मन खूप हळवं होत असल्यामुळे त्यांनी माझा फोन ब्लॉक करण्याची शक्यता आहे. त्यांचा मुडी स्वभाव असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा फॅमिलीमध्ये मिसळायचं नव्हतं त्यांना फक्त एकांतात जगायचं असल्यामुळे त्यांनी कदाचित मला ब्लॉक केलं होतं.”

मुलाखतीत पुढे गश्मीर महाजनी म्हणतो, “वडीलांच्या स्वभावाबद्दल बोलायचं तर, ते अजिबात कठोर किंवा निर्दयी नव्हते. त्यांना पुन्हा एकदा फॅमिलीच्या बंधनात अडकतील अशी भीती होती असा बहुतेक त्यांच्या डोक्यात विचार सुरू असण्याची शक्यता आहे. मध्यंतरी नातवाला भेटायला असं बोलण्यासाठी माझ्या आईने वडीलांना फोन केला होता, माझ्या बायकोनेही वडीलांना फोन केला होता. पण त्यांनी त्या दोघींनाही ब्लॉक केलं होतं. त्यांनी जरी आम्हाला ब्लॉक केलं असलं तरी, आम्ही बाकीच्यांकडून त्यांच्या विषयीची माहिती घ्यायचो.”

गश्मीरने दिलेल्या या मुलाखतीत अनेक विषयांवर त्याने मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. सोबतच गश्मीरने नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंगचा त्याला कशाप्रकारे त्रास झाला, यावर ही भाष्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे संत गजानन महाराज मंदिरात दर्शन

Crime: बॉयफ्रेंडच्या समोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, कार अडवून आधी दोघांना मारहाण, नंतर...

Bank Holiday in March कामाची बातमी! मार्चमध्ये ११ दिवस बँका बंद, RBI कडून सुट्ट्यांची यादी जारी

Holi Hair Care Tips: होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यायची?

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

SCROLL FOR NEXT