Raveena Tandon Post about Air India Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raveena Tandon: 'पुन्हा नव्याने सुरुवात...' अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियामधून प्रवास करणाऱ्या रवीनाने केली भावनिक पोस्ट

Raveena Tandon Post about Air India: अहमदाबाद विमान अपघातानंतर अभिनेत्री रवीना टंडन एअर इंडियाच्या विमानातून पाहिल्यांदाच प्रवास करत आहे. तिने विमानातील फोटो पोस्ट केले आहेत.

Shruti Vilas Kadam

Raveena Tandon Post about Air India: अहमदाबाद विमान अपघातानंतर अभिनेत्री रवीना टंडन एअर इंडियाच्या विमानातून पाहिल्यांदाच प्रवास करत आहे. तिने विमानातील फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने विमानातील "गंभीर" वातावरण आणि अलिकडच्या भयानक विमान अपघातानंतरही, क्रू मेंबर्सनी चेहऱ्यावर हास्य ठेवून त्यांचे दुःख लपवण्याचा प्रयत्नचे कौतुक केले आहे.

रवीना टंडनने एअर इंडियाच्या विमानातील अनेक सेल्फी पोस्ट केल्या आहेत. १२ जून रोजी झालेल्या भयानक विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या दुःखात देश आहे. अभिनेत्रीने सर्वांना पुन्हा निर्भय राहण्याचे आवाहन केले सोशल मीडियावर लिहिते. नवीन सुरुवात... सर्व अडचणींविरुद्ध पुन्हा उठून उडण्यासाठी... पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी, अधिक ताकदीसाठी नवीन संकल्प. वातावरण गंभीर आणि प्रवाश्यांचे स्वागत करणारा क्रू हास्य, दुःखाने रंगले आहे. शांत प्रवासी आणि क्रू अव्यक्त संवेदना आणि आत्मविश्वासाने जोडले आहेत. ज्या कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल संवेदना. कधीही बरे न होणारी जखम. @airindia ला नेहमीच शुभेच्छा. निर्भय आणि पुन्हा एकदा मजबूत होण्यासाठी आणि दुखावर मात करण्यासाठी इच्छाशक्ती. जय हिंद."

एअर इंडियाच्या विमान अपघात

एअर इंडिया-१७१ विमानात २४२ लोक होते. लंडनला जाणारे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले. प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. अपघातानंतर विमानातील एकमेव वाचलेला व्यक्ती विश्वकुमार रमेश होता, जो सीटच्या ११ए मध्ये बसला होता. तो बचावला आणि आपला जीव वाचवण्यासाठी वेळेवर विमानातून उडी मारण्यात यशस्वी झाला.

एअर इंडियाने म्हटले आहे

ताज्या अपडेटनुसार, अधिकाऱ्यांनी अपघातस्थळावरून दोन्ही ब्लॅक बॉक्स शोधून काढले आहेत आणि डेटाचे विश्लेषण सध्या सुरू आहे. काही क्षणांनंतर वैमानिकाने विमान वाहतूक नियंत्रणाला "मेडे" अलर्ट जारी केला.काही क्षणांनंतर वैमानिकाने विमान वाहतूक नियंत्रणाला "मेडे" अलर्ट जारी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT