Badshah Instagram @badboyshah
मनोरंजन बातम्या

Badshah Fairplay App: बादशहाची तब्बल चार तास कसून चौकशी, नेमकं काय आहे जाहिरात प्रकरण?

Maharashtra Police: ॲपची जाहिरात केल्या प्रकरणी रॅपर आणि गायक बादशहाला महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाढ

Rapper Badshah In trouble Due Advertisement Of Fairply:

फेअरप्ले या ॲपची जाहिरात केल्या प्रकरणी रॅपर आणि गायक बादशहाला महाराष्ट्र सायबर सेल पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. वाय कॉम १८ या कंपनीने या ॲपची तक्रार पोलिसात केली होती. फेअरप्ले या ॲपने आयपीएल क्रिकेट सामने वाय कॉमच्या परवानगी शिवाय दाखविल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यानंतर या कंपनीने सायबर सेलकडे डिजिटल कॉपीराईट तक्रार केली.

गायक बादशहा या ॲपची जाहिरात करत असल्याने त्याला आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. बादशहासह यात अजून ४० बॉलिवूड सेलिब्रिटींचा समावेश आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने बादशहाची चार तास सखोल चौकशी केली आहे. बादशहा चौकशीनंतर पोलीस कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्याच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. वकिलांनाही बादशहाचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले. तसेच त्याने कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचा खुलासा देखील वकिलांनी केला. (Latest Entertainment News)

बादशहाचे वकील काय म्हणाले?

बादशहाचे वकील प्रशांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, 'आज महाराष्ट्र सायबर पोलिसांनी रॅपर बादशहाला समन्स देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होते. त्यानुसार बादशहा चौकशीसाठी हजर झाला होता. तो या प्रकरणातला आरोपी नसून या प्रकरणात साक्षीदार म्हणून त्याची चौकशी करण्यात आली आहे. बादशहाने काहीच चुकीच केलेलं नव्हतं आणि त्याप्रमाणे त्याने जबाब सुद्धा दिलेला आहे.

तपास यंत्रणांनी ज्याप्रमाणे बादशहाकडे डॉक्युमेंट्स किंवा बँक डिटेल्स मागितले ते सर्व पुरावे त्याने दिले आहेत. त्याला या ॲप संदर्भात काहीच माहीत नव्हते. कुठल्याही कलाकाराला यासंदर्भात माहिती नसते. त्यांच्याकडून एक कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेण्यात येते आणि त्याप्रमाणे ते काम करतात. याचे संपूर्ण ट्रांजेक्शन बँकच्या माध्यमातून झाले असल्याची अशी माहिती आहे.'

काही दिवासांपूर्वी महादेव बेटिंग ॲप प्रकरणी देखील अनेक सेलिब्रिटींना ईडीने समन्स बजावले होते. अभिनेता रणबीर कपूर, हुमा कुरेशी, कपिल शर्मासह अनेक प्रसिद्ध कलाकारांचा (Celebrity) समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण, आज पुन्हा होणार सुनावणी

Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहि‍णी अपात्र, सरकार वसूली करण्याची शक्यता

Accident: देवघरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची समोरासमोर धडक; १८ जणांचा मृत्यू

Mangalwar Upay: मंगळवारच्या दिवशी शिवभक्तांनी हनुमानाचीही करावी पुजा; हे उपाय करणं ठरेल फायदेशीर

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

SCROLL FOR NEXT