Badshah Sanak Music Controversy Instagram/ @
मनोरंजन बातम्या

Badshah Sanak Music Controversy: बादशाहाच्या नवीन गाण्यावर संत- महंतांनी घेतला आक्षेप, शिवभक्तांनी नोंदवला एफआयआर; नेमकं काय आहे प्रकरण?

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर बादशहाचं नवं अल्बम साँग रिलीज झाल्यापासून बराच वाद उफाळून आला आहे.

Chetan Bodke

Badshah Sanak Music Controversy: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर बादशाह सध्या त्याच्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. नुकताच बादशाहचा नवं अल्बम साँग रिलीज झाल्यापासून बराच वाद उफाळून आला आहे. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर भगवान शंकराच्या भक्तांनी रॅपरवर एफआयआर नोंदवला आहे.

रॅपर बादशाहने नव्या गाण्यात भगवान शंकराचा उल्लेख केला आहे. या गाण्याचे बोल अश्लील असल्याचे म्हणत महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांसोबतच संत- महंतांनीही त्याच्या अल्बमवर तीव्र आक्षेप घेतला आहे. रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनक अल्बममधील एका गाण्याने महाकालचे अनेक पुजारी संतापले आहेत. (Entertainment News)

“भगवान शंकरांचे नाव जर घ्यायचे असेल तर त्यांचे भजन करा आणि सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल करा. पण स्वत:च्या प्रसिद्धीसाठी देव- देवतांच्या नावाचा गैरवापर करत अशी प्रसिद्धी खपवून घेतली जाणार नाही. कोणतेही अभिनेता किंवा अभिनेत्री असो, त्यांना देवाच्या नावाखाली अश्लिलता पसरवण्याचा अधिकार नाही. याच्या आम्ही विरोधात आहोत.” असे पुजारी म्हणतात. (Bollywood News)

सनक नावाच्या अल्बममधील हे गाणं सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. आतापर्यंत या गाण्याला युट्युबवर १.८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात काही प्रमाणात अश्लिल शब्दांचा वापर करत उल्लेख केला आहे, असे म्हणत अनेक शिवभक्त सोशल मीडियावर चांगलेच संतापले आहेत. गाण्याच्या काही भागांवर आक्षेप नोंदवला असून या वादावर रॅपर बादशाहने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

EPFO Update: पीएफ खात्यातून पैसे काढण्याची झंझट संपणार; ATM ची सुविधा कधीपासून सुरू होणार, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितली तारीख

Fake Friend: तुमच्या आजूबाजूला असलेले फेक फ्रेंड्स कसे ओळखायचे? जाणून घ्या 'या' सिक्रेट टिप्स

Manikrao Kokate News: कॅबिनेटमधून कोकाटे आऊट मुंडे इन? मंत्रिपदासाठी मुंडेंची दिल्ली दरबारी फिल्डिंग

Chanakya Niti: फक्त मेहनत अन् शिस्त नव्हे, यशस्वी लोकांची ही गुपितं करा फॉलो, शत्रूही होतील मित्र

SCROLL FOR NEXT